कोल्हापूर जिल्हा ग्रंथ महोत्सव मोठ्या उत्साहात करूया- प्रसाद कुलकर्णी
इचलकरंजी ता.१६-“शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या उत्कर्षासाठी वाचन चळवळ गतिमान करणे आवश्यक आहे.त्यासाठी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीचा कोल्हापूर जिल्हा ग्रंथ महोत्सव हातकणंगले तालुक्यातील सर्व ग्रंथालयांच्यावतीने मोठ्या उत्साहात करूया.”असे आवाहन समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
हातकणंगले तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्यावतीने कोल्हापूर जिल्हा ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यासंदर्भात आपटे वाचन मंदिर सभागृहात हातकणंगले तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या पदाधिकारी व कर्मचारी यांच्या प्राथमिक बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.
श्री.कुलकर्णी म्हणाले,” कोल्हापूर जिल्हा ग्रंथ महोत्सव आयोजित करण्याची संधी यावर्षी हातकणंगले तालुक्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मिळालेली आहे.आपण सर्वांनी त्यासाठी सक्रीय योगदान देऊन आदर्श असा जिल्हा ग्रंथ महोत्सव संपन्न करूया. याबाबत पुन्हा एक व्यापक मीटिंग जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होईल त्यातही सर्वांनी सहभागी व्हावे.”
आपटे वाचन मंदिरचे ग्रंथपाल आनंदा काजवे यांनी स्वागत केले.प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.कोल्हापूर जिल्हा ग्रंथ महोत्सव यशस्वी करण्यासंदर्भात चर्चेमध्ये अरुणकुमार पिसे(रेंदाळ) सर्जेराव मोरे (घुणकी),पद्माकर तेलसिंगे,अल्ताफ जमादार (इचलकरंजी), शशिकांत कांबळे (चावरे),गीता भोई,विष्णू चव्हाण (कबनूर),सतीश खरात (बिरदेववाडी), दिलीप पाटोळे (हातकणंगले),धोंडीराम पिंपळकर (सावर्डे),सुरेखा श्रीराम (इचलकरंजी) आदींनी सहभाग घेतला.यावेळी जगन्नाथ भोई,सुरेखा श्रीराम,राजेंद्र अवघडे,जीवन यशवंत,राजू बसप्पा, सूर्यकांत महाजन,राजेंद्र देशमुख,रामदास पेटकर, सतीश शिणगारे,निहाल ढालाईत,प्रवीण पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.आनंदा काजवे यांनी सूत्रसंचालन केले.अरुणकुमार पिसे यांनी आभार मानले.
फोटोओळ-
इचलकरंजी- कोल्हापूर जिल्हा ग्रंथ महोत्सव संदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना प्रसाद कुलकर्णी शेजारी आनंदा काजवे,गीता भोई,प्रा.रवींद्र पाटील
फोटोक्रमांक-

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800