जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये डॉ स्मिता व भूषण काळे यांचा शोध प्रबंध सादर.
आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे संयोजित दहावी जागतिक आयुर्वेद परिषद दिनांक 12 ते 15 डिसेंबर दरम्यान देहरादून उत्तराखंड येथे संपन्न झाली. सदर परिषद ही जगातील सर्वात मोठी आयुर्वेदाची परिषद होती. यामध्ये भारतासह ५५ हून अधिक देशातील आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्धा अशा विविध पॅथीच्या दहा हजार हून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. या परिषदेचा उद्घाटन सोहळा १२ डिसेंबर रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धामी व केंद्रीय आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला.
या परिषदेमध्ये आरोग्य एक्सपोचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते जे एक लाख स्क्वेअर फुट इतक्या भव्य दिव्य परिसरामध्ये आयोजित केले होते. ज्यामध्ये २०० हून अधिक औषधी कंपन्यांनी सहभाग घेतला.यामध्ये मोफत आयुष्य द्वारे पाच हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी सुद्धा करण्यात आली.
जगभरातून आलेल्या चौदाशे पन्नास हून अधिक डॉक्टरांच्या रिसर्च पोस्टर्सचे व १५०० हून अधिक रिसर्च पेपर्स चे या परिषदेमध्ये सादरीकरण झाले.
ज्यामध्ये डॉक्टर स्मिता काळे यांनी उत्तर वस्ती चिकित्स्याचे वंध्यत्वातील महत्त्व तर डॉक्टर भूषण काळे यांनी पुरुष वंध्यत्व व लैंगिक समस्यांवरील आयुर्वेदिक उपचार या विषयावर आपल्या शोध प्रबंधनांचे सादरीकरण केले. वंध्यत्वाच्या वाढत्या समस्येवर डॉक्टर काळे दांपत्यांनी केलेले सादरीकरण सदर परिषदेमध्ये लक्षवेधी ठरले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800