इचलकरंजीचा नगरभूमापन अधिकारी दुष्यंत कोळी लाचलुचपतच्या जाळ्यात
इचलकरंजी
इचलकरंजी येथील नगरभूमापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी, सध्या रा. फॉर्च्यून प्लाझा मागे, प्लॅट नं.२०७, फॉर्च्यून अव्हेन्यु, सांगली रोड, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर मुळ रा. शिरोळ वाडी रोड प्रभात हॉस्पीटल, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर याला ७५ हजार रुपयांची लाच मगितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने पकडले.
यातील तकारदार यांचे व सहहिस्सेदार यांचे मालकीचे मौजे शहापूर ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे गट नं.४५४, सि.स.नं.१९०२१ मध्ये प्लॉट नं. २७,२८,२९,३० असे प्लॉट असून त्यापैकी प्लॉट नं.२७,३० व प्लॉट नं. २८,२९ असे प्लॉट सामीलीकरण होण्याकरीता तकारदार यांनी नगर भुमापन अधिकारी कार्यालय, इचलकरंजी यांचे कार्यालयाकडे २२ जुलै रोजी अर्ज केले होते. सदरचे अर्ज नगर भुमापन कार्यालयातील एका कर्मचारी यांचेकडे असल्याने तकारदार यांनी त्यांचेकडे चौकशी केली, त्यावेळी सदर कर्मचारी यांने तक्रारदार यांचे दोन्ही अर्ज व प्रकरणे ही जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कोल्हापूर यांचे कार्यालयाकडे पाठवून त्याची प्रत तक्रारदार यांना दिली. होती. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी सदर कर्मचारी याने तकारदार यांना जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कोल्हापूर यांचे कार्यालयालयातील तुमचे अर्ज ज्या टेबलला आहेत त्या टेबल चा चार्जही माझ्याकडे आहे. मी तेथुन तुमच्या अर्जावर मंजूरी घेवून आणू शकतो, त्याकरीता ३०,०००/- रू. द्यावे लागतील असे म्हणून त्यांचे वरिष्ठांचे करीता लाचेची मागणी केली. त्यानंतर तकारदार यांनी लाचलुचपत विभाग कोल्हापूर येथे तकार दिलेली होती.
तकारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणी मध्ये नगर भूमापन कार्यालयातील तक्रारदार यांचे काम पाहणारे कर्मचारी याने तक्रारदार यांना त्यांचे वरिष्ठ नगर भूमापन अधिकारी कोळी यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार हे दुष्यंत कोळी यांना भेटले असता नगर भूमापन अधिकारी कोळी यांनी तक्रारदार यांचे प्लॉटचे सामीलीकरणाचे काम जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख कोल्हापूर यांचे कार्यालयातून करून घेण्याकरीता म्हणून त्यांचे वरिष्ठांकरीता तक्रारदार यांचेकडे पंच्याहत्तर हजार रूपये लाचेची मागणी केलेचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक दुष्यंत विश्वास कोळी, नगर भूमापन अधिकारी, इचलकरंजी वर्ग-२ रा.इचलकरंजी यांनी तक्रारदार यांचेकडे ७५,०००/- रूपये लाचेची मागणी मागणी केली आहे म्हणुन दिले फिर्यादीवरून त्याचेविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे. श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांचे मार्गदर्शनानुसार वैष्णवी सुरेश पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. कोल्हापूर, पोलीस निरीक्षक बापू सांळूके, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पो.हे. कॉ. संदिप काशिद, पो.ना. सचिन पाटील, पो.ना.सुधिर पाटील, म.पो.कॉ. पुनम पाटील चा.पो.कॉ. प्रशांत दावणे अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.
सामान्य नागरिकांना कोळीचा त्रास-
पूर्वीं डॉक्टरकी करून नंतर प्रशासकीय सेवेत आलेल्या दुष्यंत कोळीच्या अधिकारक्षेत्रात असणाऱ्या नगरभूमापन कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारायला लावणे,जिल्हाधिकाऱ्यानी दिलेल्या निकाल प्रकरणाची परत सुनावणी घेणे,कर्मचारी ऐकत नसल्याचे सांगत आर्थिक व्यव्हार करणे,एजंटांची कामे लवकर करणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या .याचाच आज परिपाक होऊन लाचलुचपतची कारवाई झाली असून आर्थिक भानगडी करण्याऱ्या अजुन २ कर्मचारी यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी असून त्याचाही उद्रेक लवकरच होणार आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800