आयजीएममध्ये धनुर्वातच्या इंजेक्शनचा तुटवडा,नागरिकांतून नाराजी
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये धनुर्वात चे इंजेक्शन उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून नावारूपाला आणण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी व शासन करत आहे.बऱ्याच अंशी सुधारणा होत असली तरी म्हणावे तसे मनुष्यबळ व औषध पुरवठा होत नसल्याने रुग्णांना अडचणीस तोंड द्यावे लागत आहे.
चांगले अधिकारी व कर्मचारी आले तरी शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. आज याबाबत माहिती घेतली असता इचलकरंजी शहरासाठी आयजीएम प्रशासनाकडून सीपीआरकडे धनुर्वातच्या दहा हजार व्हायलची मागणी सातत्याने होत आहे. एक व्हायल मध्ये वीस इंजेक्शन होतात पण त्यांना सीपीआर कडून सिंगल १२० इंजेक्शन दरमहा मिळत आहेत. दोन लाख इंजेक्शन डोसची मागणी असताना १२० इंजेक्शन दिले जातात या शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका नागरिकांना बसत आहे.
व त्यांना नाहक त्रास होऊन खाजगी दवाखान्यात जावं लागत आहे व तेथे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
धनुर्वातचे इंजेक्शन हे सातत्याने लागणारे असून अगदी साधारण गोष्ट आहे ते सुद्धा उपलब्ध नसल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोशल मिडियावर झालेल्या चर्चेनंतर आयजीएम प्रशासनाने हालचाल करत तातडीने गाडी पाठवून १२० इंजेक्शन उपलब्ध केले.मात्र असे प्रकार परत होऊ नये यासाठी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रुग्णांची गैरसोय व हेलपाटे-
आज सकाळी एका रुग्णास रेबीज व धनुर्वात दोन्ही इंजेक्शन घ्यायचे होते त्यास रेबिजचे इंजेक्शन मिळाले मात्र धनुर्वातसाठी खाजगी दवाखान्यात जावे लागले, यामुळे वेळ व पैसा दोन्ही वाया गेल्याने संबंधित रुग्णाणे नाराजी व्यक्त केली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800