अस्थिरोग तज्ञ सुरज पाटील इंदिरा गांधी रुग्णालयातुन कार्यमुक्त-आ.राहुल आवाडेंच्या तक्रारींवर कारवाई
इचलकरंजी –
आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी दुपारपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरज बाबासाहेब पाटील यांना कार्यमुक्त करण्यात आले. डॉ. पाटील यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून समितीची अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ उपसंचालक डॉ. एस. डी. सुर्यवंशी यांनी दिली.
रुकडी (ता. हातकणंगले) येथील सर्वसामान्य कुटुंबातील दहा वर्षाची मुलगी पडल्याने तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले. तिच्या आईने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणले असता त्याठिकाणी ड्युटीवर असलेल्या अस्थिरोग तज्ञ डॉ. सुरज पाटील यांनी याठिकाणी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपचार व सुविधा नसल्याचे सांगत त्या मुलीला खाजगी रुग्णालयाची चिठ्ठी देत त्याठिकाणी उपचारासाठी जाण्यास सांगितले. परंतु त्याठिकाणी उपचारासाठी 10 हजाराचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितल्यानंतर सदर मुलगी व तिच्या आईने या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यावर आमदार आवाडे यांनी थेट रुग्णालय गाठत डॉ. पाटील यांची कानउघडणी करत परवाना रद्द करण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात आमदार आवाडे यांनी गुरुवारी थेट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करत कारवाईची मागणी केली. त्यानुसार गुरुवारी आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ उपसंचालक डॉ. एस. डी. सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनिधी डॉ. सरीता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर आदींनी रुग्णालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी रुग्णालयातील निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. अमित सोहनी, वैद्यकिय अधिक्षक डॉ. रुपाली भाट, प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. रामचंद्र लवटे, वैद्यकिय अधिकारी डॉ. आशिष घाडगे यांची उपस्थिती होती.
चौकशीसाठी उपसंचालक डॉ. एस. डी. सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक प्रतिनिधी डॉ. सरीता थोरात व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांच्या त्रिसदस्यीय समितीने सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जबाब नोंदवून घेतले असून प्राथमिक चौकशीत केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले आहे. त्यानुसार डॉ. पाटील यांना दुपारपासून कार्यमुक्त करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुर्यवंशी यांनी दिली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800