इचलकरंजीत मंगळवारपासून अन्न उत्सव उपक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत मंगळवारपासून अन्न उत्सव उपक्रम

इचलकरंजी
इचलकरंजी येथील सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल ही संस्था गेली ३२ वर्षे नियमितपणे कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय रोटरीचा एक भाग असलेल्या या संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात, त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेच्या वतीने इचलकरंजी शहरात ‘रोटरी सेंट्रल अन्न उत्सव – फूड फेस्टिवल’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे. इचलकरंजी, दावणगिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज, बेळगाव इत्यादी शहरातील तसेच इतर राज्यातील नामांकित हॉटेल्स आणि केटरिंग व्यावसायिकांचे फूड स्टॉल त्याचबरोबर विविध ग्राहक उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.
मंगळवार दिनांक २१ जानेवारी ते २७ जानेवारी २०२५ या सात दिवसाच्या कालावधीत दररोज दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत केएटीपी ग्राउंड, आंबेडकर पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे हा उपक्रम होणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रीयन, गुजराथी, साउथ इंडियन, पंजाबी, कॉन्टिनेन्टल, फास्ट फूड, पॅकिंग फूड, कबाब, चाट, तंदूर अशा प्रकारचे शाकाहारी तसेच मांसाहारी रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. समाजातील सर्व जाती धर्म तसेच सर्व स्तरातील नागरीक वर्गास आस्वाद घेण्यासाठी त्याचबरोबर शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती व छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसाय वाढीसाठी हा उपक्रम उपयुक्त असा आहे.
या उपक्रमाचे उदघाटन मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि
रोटरी प्रांत ३१७०चे प्रांतपाल शरद पै, बेळगाव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी चितळे डेअरी भिलवडीचे रो. गिरीश चितळे आणि दावत राईसचे सुभाष छाबडा यांची यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
सदरच्या उपक्रमाचा समारोप सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रमुख पाहुणे माजी आमदार प्रकाशराव आवाडे आणि माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. रोटरी प्रांत ३१७०चे नियुक्त प्रांतपाल अरूण भंडारे आणि सहायक प्रांतपाल दादासो चौगुले हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अन्न उत्सव उपक्रमाच्या ठिकाणी दर्शकांसाठी दररोज मनोरंजनाचे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये हिंदी व मराठी गीत गायन, लाईव्ह आर्केस्ट्रा, फॅशन शो, ग्रुप डान्स, मिमिक्री, फनी गेम्स आणि कराओके गीत गायन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिनांक २२ रोजी तिळापासून गोड पदार्थ आणि नाचणीपासून तिखट पदार्थ, २३ जानेवारी रोजी संक्रांत थाळी आणि २४ जानेवारी रोजी चिकनपासून कटलेट आणि पांढरा रस्सा बनवणे या पाककला स्पर्धा होणार आहेत. सदरच्या उपक्रमात दररोज निवडक रसिकांसाठी आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहेत. तरी या अन्न उत्सव उपक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी शहर व परिसरातील नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.पत्रकार परिषदेस रो. शिवकुमार धड्ड (प्रोजेक्ट चेअरमन) रो. सतीश पाटील (प्रेसिडेंट),रो. शीतल भरते (प्रोजेक्ट सेक्रेटरी),रो. नागनाथ बसुदे (प्रोजेक्ट ट्रेझरर),रो. नितीनकुमार कस्तुरे,रो. हिराचंद बरगाले,रो. घनश्याम सावलानी ,रो. राजू तारदाळे,रो. प्रमोद महाजन,रो. संजय होगाडे उपस्थित होते
 अन्न उत्सव ची वैशिष्ट्ये
जवळपास ८० स्टॉलमध्ये दावनगिरीहून डोसा,सांगली हुन व्हेज पराठा,राजस्थानी स्टॉल,कोकणाहुन मासे,सोळंकी आईस्क्रीम याचबरोबर घरगुती पदार्थ बनविणाऱ्या महिलांसाठी सलग ३ दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचबरोबर सर्व स्पर्धातून कोण होणार अन्नपूर्णा हि स्पर्धा घेण्यात येणार आहे.
शाकाहारी व मांसाहारी दोन्ही विभाग वेगवेगळे केले असून शहरवासियांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More