इचलकरंजीत कर्ज देण्याच्या बहाण्याने ७ लाख ९८ हजारांची फसवणूक
इचलकरंजी:
महिलांना व बचतगटांना कर्ज प्रकरण करून देण्याच्या बहाण्याने महिलांसह अनेकांची ७.९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी नितीन विठ्ठल धनवडे (वय ४८,रा. निमशिरगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सपना सुभाष पोवार (वय ३६, व्यवसाय बचत गटाचे काम, रा. कामगार चाळ,शाहूपुतळा रोड, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार: आरोपी धनवडे याने सी.एम.ई.जी.पी (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना) अंतर्गत कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत महिलांसह इतर काही जणांकडून १५ जुलै २०२४ ते १८ जानेवारी २०२५ पर्यत रोख व ऑनलाइन स्वरूपात ७ लाख९८ हजार रुपये उकळले. कर्जासाठी लागणाऱ्या प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली ही रक्कम घेऊन आरोपीने कोणतेही काम न करता तक्रारदार व इतरांची फसवणूक केली.
फिर्यादीसह फसवणूक झालेल्यामध्ये सुनिता जाधव,शालन हजारे,चैत्राली मगदूम,अनिता हांजी, महादेवी पाटील,स्वाती मोहिते, मनिषा पारळे,नंदिनी पारळे इत्यादी महिलांचा समावेश आहे.
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील. तपास पोसई प्रदीप जाधव करत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800