शिवनाकवाडीच्या उपसरपंचपदी सौ. दिपाली भिलवडे यांची बिनविरोध निवड
शिवनाकवाडी:
शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सौ. दिपाली प्रकाश भिलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी उपसरपंच अनिल खोत यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त होती. सदर रिक्त जागेसाठी भाजपच्या ग्रा.प.सदस्या सौ. दिपाली भिलवडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षीय अधिकारी तथा सरपंच सौ. सरिता खोत यांनी सौ. दिपाली भिलवडे यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले सौ. दिपाली भिलवडे यांचे नाव सुचक म्हणून श्रीकांत खोत यांनी सुचवले. सचिव म्हणून ग्रामसेवक व्ही.टी. कोळी यांनी काम पाहिले यावेळी नुतन उपसरपंच यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सौ. दिपाली भिलवड़े म्हणाल्या, माझ्यासारख्या सामान्य महिलेला उपसरपंचपदाची संधी दिली. माझ्या उपसरपंच पदाच्या कार्यकाळात गावातील विकासकामांवर भर देणार असून गावच्या विकासासाठी सरपंच, सर्व सदस्यांच्या सहकार्यातून शिवनाकवाडी गाव रोल मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सौ. दिपाली भिलवडे यांनी सांगितले. यावेळी संतोष खोत, विजय खोत यांनी मनोगत व्यक्त किले. यावेळी माजी सरपंच श्रीकांत खोत, पोलीस पाटील विवेक खोत, अनुसया खोत, सौ. लक्ष्मी आरंगे, सौ. वत्सला हांडे, सौ. अश्विनी खोत, सौ. आशा खोत, इरशाद आत्तार, अनिल खोत, दीपक खोत, सुरेश चंडके, माजी सरपंच भुपाल खोत, तंदामुक्त अध्यक्ष रावसाहेब आगे, प्रकाश भिलवडे, दगडू भिलवडे, जगन्नाथ खोत, धोंडीराम हांडे, सोमनाथ भिलवडे, सुरज भिलवडे, रमेश भिलवडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सौ. दिपाली भिलवडे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. स्वागत ग्रामसेवक व्ही.टी. कोळी केले. आभार राजू भाणसे यांनी मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800