ओव्हरलोड वाहतूक बंद करा,ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे निवेदन.
इचलकरंजी
इचलकरंजी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी ‘ओव्हर हाईट’ कापड गाठी वाहतुकीवर कारवाई करावी याकरिता प्रादेशिक परिवहन विभागाकडे कोल्हापूर जिल्हा मोटर मालक संघटना,दि मँचेस्टर मोटर मालक संघटनाच्या वतीने देण्यात आला.
नियमितपणे १२.६ फूट उंचीपर्यंत मालवाहतूक करण्यास परवानगी असताना, काही वाहने १५.५ फूट किंवा त्याहून अधिक उंचीच्या कापड गाठींची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या नियमबाह्य वाहतुकीमुळे अपघात, रस्त्यांचे नुकसान, विद्युत तारा अडकणे, आणि पर्यावरणीय हानी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी आपल्या निवेदनात या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत,यासाठी जनजागृती मोहिमा राबविण्याचीही आवश्यकता आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने या समस्येवर त्वरित लक्ष देऊन,’ओव्हर हाईट’ मालवाहतुकीवर निर्बंध लावावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष कुमार. पाटील,उपाध्यक्ष श्री. राजू परशुराम माने,सेक्रेटरी श्री.संजय थ.मगदूम,रामा खरात,संजय अवलक्की,सुशांत खरात,सचिन जाधव,आनंदा नेमिष्टे,श्रेणीक मगदूम,प्रभू काकणगे,रामचंद्र जगताप,विनायक विरडे,धनंजय साळुंखे उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800