जवाहर साखर कामगार संघटनेच्या वतीने साखरशाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वितरण.
इचलकरंजी :
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याकडील ऊसतोड मजुरांच्या साखर शाळेतील मुलांना जवाहर साखर कामगार संघटना यांचे वतीने शालेय गणवेशाचे वाटप करणेत आले.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे धोरण पहिल्यापासून सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे असेच आहे. याप्रसंगी शिक्षणविस्तार अधिकारी श्री. बिरणगे यांनी, कारखाना व संघटना यांच्या साखर शाळेतील मुलांसाठी या योजना व उपक्रम राबवले जातात त्या मुलांना कारखान्याने शाळेपर्यंत ने-आण करणेसाठी केलेली व्यवस्था व देण्यात येणार्या सेवा सुविधा याबाबत समाधान व्यक्त केले. साखर कारखान्याकडील ऊसतोड तसेच स्थलांतरीत मजुरांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण समन्वय बाबुराव पाटील यांनी शासनाकडून करण्यात येणार्या विविध उपाययोजनांची माहिती देवून राज्यात जवाहर साखर शाळा एक आदर्श मॉडेल आहे असे गौरवोद्गार काढले. तसेच 2010 पासून बदललेल्या नियमानुसार या विद्यार्थ्यांना कारखान्याजवळील शाळात जाऊन शिक्षण घ्यावे लागते, त्यामुळे होणार्या परिणामाचा आढावा घेतला. अवनी संस्थेचे श्री. माहिते यांनी ही सर्व मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी आमची संस्थाही काम करते. तसेच त्याकरिता जवाहर साखर कारखान्यासारख्या संस्थांची आम्हास चांगली मदत मिळते, असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक कामगार संघटनचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांनी केले. साखर शाळेसाठीचे जवाहरचे समन्वयक आण्णासो गिरीबुवा व उमेश कांबळे यांनी कारखान्याकडून करण्यात येणार्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील, एच. आर. मॅनेजर अनिल वलशेट्टी, जिल्हा परिषदेचे श्री. साळोखे, श्री. सदलगे उपस्थित होते तर आभार संघटनेचे सदस्य सुरेश पोवार यांनी मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800