आमदार राहुल आवाडे यांचा पाठपुरावा
सह दुय्यम निबंधक वर्ग २ च्या इमारत बांधकामासाठी ३.८८ कोटी मंजूर
इचलकरंजी –
इचलकरंजी येथील सह दुय्यम निबंधक वर्ग २ या कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी राज्याच्या महसुल व वन विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यात याकामासाठी ३.८८ कोटीचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खरेदी-व्रिकी व्यवहारासह विविध कामे आता एकाच ठिकाणी व एकाच छताखाली होणार असल्याने नागरिकांनाही सोयीचे होणार आहे.
इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. याठिकाणी शहरासह औद्योगिक पसाराही झपाट्याने वाढत चालला आहे. भौगोलिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या शहरातील जमीन खरेदी-विक्री, तारण, दस्त, वाटणीपत्र, मृत्यूपत्र आदी कामांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात जावे लागते. सध्या येथील राजाराम स्टेडीयम आणि गोविंदराव हायस्कुलसमोर अशी दोन कार्यालये आहेत. मात्र दोन्ही ठिकाणच्या कार्यालयाची जागा अतिशय छोट्या आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रत्येक कामासाठी कार्यालयाबाहेर ताटकळ बसावे लागते. शिवाय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनाही अपुर्या जागेमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. नागरिकांना कामासाठी आल्यानंतर बसणे तर दूरच उभे राहण्यासाठीही जागा नसते. त्यामुळे कार्यालयाबाहेरच उन्हात तिष्ठत रहावे लागते. प्रसंगी एकाच कामासाठी अनेकवेळा हेलपाटे मारावे लागतात.
या सर्व गोष्टींबाबत नागरिकांसह कार्यालयाकडून स्वतंत्र व सुविधांनीयुक्त अशी इमारत व्हावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. या संदर्भात माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु केला होता. त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी शासनाकडे प्रयत्न सुरु ठेवले होते. त्यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजीतील सह दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालयासाठी नवीन इमारत बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार करुन दिल्यानंतर त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग पुणे यांनी सहमती दर्शवत शासनाकडे प्रस्ताव दिला होता. राज्याच्या महसुल व वन विभागाने नवीन इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासाठी ३.८८ कोटीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आता एकाच इमारतीत व एकाच छताखाली सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या वेेळेची बचत होण्यासह व आर्थिक त्रासही सोसावा लागणार नसल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800