१०० दिवसात घरकुल पुर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना आ.राहुल आवाडेंकडून १० हजार रुपयांचे बक्षीस.
इचलकरंजी
चंदूर येथील ३५२ घरकुल मंजूर झालेली असून या योजनेचा १०० दिवसात लाभ घेणाऱ्या व घरकुल वेळेत पुर्ण करणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यास १० हजार रुपये देणार असल्याची घोषणा आमदार राहुल आवाडे यांनी केलीं आहे.आमदार राहुल आवाडे यांनी, सर्वच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन शंभर दिवसांत विनाअडथळा घरकुल पूर्ण करावे. घरकुल पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांस म्हणजेच ३५२ लाभार्थ्यांना माझ्याकडून व्यक्तीगतरित्या १० हजार रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. घरकुल लाभार्थ्यांना एखाद्या लोकप्रतिनिधीकडून १० हजार रुपये देण्याची राज्यातील पहिलीच घटना आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800