महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचा वर्धापन दिन साजरा
इचलकरंजी
महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचा वर्धापन दिन महानगरपालिका सभागृहात अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करणेत आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त स्मृती पाटील यांनी संघटनेला आवश्यक ती मदत करुन पाठबळ देणेची ग्वाही दिली.
या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने महानगरपालिका आरोग्य विभागाकडील उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करणेत आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण लाखे यांनी तर सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले.
या प्रसंगी सहा.आयुक्त विजय राजापुरे,आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांचेसह मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी, मंगेश दूरुगकर, महादेव मिसाळ स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव, सुरज माळगे, सुरज पांगरे, संदीप मधाळे, बबन कांबळे, उमेश कांबळे, संग्राम भोरे, पेत्र भोरे, संदीप कांबळे, जयदीप शिंदे, कविता सोळंकी यांचेसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800