इचलकरंजीत १ मार्च रोजी ‘हिराज श्री’ भव्य राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत १ मार्च रोजी ‘हिराज श्री’ भव्य राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा

इचलकरंजी:
पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची लयलुट असलेल्या इचलकरंजीतील ‘हिराज श्री २०२५’ भव्य राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन शनिवार १ मार्च रोजी करण्यात आले आहे. तब्बल ७ लाख रुपयांची रोख बक्षिसे असणार्‍या या स्पर्धेसाठी सेलिब्रेटी ट्रेनर मनिष अडविलकर हे या स्पर्धेचे विशेष अन् खास आकर्षण तर डॉ. प्रशांत मदने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती हिराज फौंडेशनचे प्रमुख दीपक माने आणि बाळासाहेब माने यांनी दिली.
इचलकरंजीत ही वस्त्रनगरीबरोबरच क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. मात्र याठिकाणी शरीरसौष्ठव स्पर्धा म्हणाव्या त्या प्रमाणात होत नाहीत. म्हणूनच हा खेळ रुजावा, वाढावा आणि तो जोपासला जावा या उद्देशाने हिराज फौंडेशनच्या वतीने प्रत्येक दोन वर्षांनी हिराज श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा भरविली जाते. त्यामुळे इचलकरंजी आणि हिराज श्री हे एक वेगळे नाते यानिमित्ताने निर्माण झाले आहे. उदंड प्रतिसादात यंदा ही स्पर्धा १ मार्च रोजी महर्षि विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या मैदानावर होत आहे. ही स्पर्धा विविध ९ वजनी गटात होणार आहे. त्यामध्ये ८ बॉडी बिल्डींग ग्रुप व१ मेन्स फिजिक गु्रप अशी वर्गवारी असणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे १० हजार, ८ हजार, ७ हजार, ६ हजार व ५ हजार अशी रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. तर हिराज श्री २०२५ चा मानकरी ठरणार्‍या विजेत्यास ५५,५५५रुपये रोख आणि भव्य अशी ट्रॉफी दिली जाणार आहे. उपविजेत्यास ३५,५५५ रुपये रोख, बेस्ट म्युझिक पोझर आणि मोस्ट इम्प्रुव्ह बॉडी बिल्डर यांना प्रत्येकी १०,५५५ रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. त्याशिवाय विजेत्या खेळाडूंना फूड सप्लीमेंट पॅकेट ,पिनट बटर तसेच स्मार्ट वॉच साऊंड बार इयरबर्ड अशी बक्षिसे दिली जातील.
या स्पर्धेत महाराष्ट्र आणि सीमा भागातून ३०० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार  आहेत. भव्य स्टेज, आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट आणि जवळपास ५० हजार  क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेचा आनंद प्रत्येकाला लुटता यावा यासाठी प्रेक्षकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. स्पर्धेसाठी पंच म्हणून महाराष्ट्रातील अधिकृत पंच उपस्थित राहणार असून त्यामध्ये राष्ट्रीय, राज्य पंचाचा समावेश असणार आहे. यावेळी आशिष यादव, अजिंक्य रेडेकर, सुजय शेळके, अमित सावंत, दिलीप पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रोख बक्षिसाची स्पर्धा.
शरीरसौष्ठव व व्यायामाची आवड निर्माण व्हावी याकरिता कार्यरत असणाऱ्या हिराज फौंडेशन कडून सर्वात जास्त रोख रक्कमेच्या बक्षिसाची स्पर्धा असल्याचे दिपक माने यांनी स्पष्ट केले.७ लाख रुपयांची रोख बक्षिसे स्पर्धेत असणार आहेत तसेच स्पर्धकांची राहण्याची योग्य सोय करत जास्तीत जास्त नागरिकांना स्पर्धेचा लाभ घेता यावा यासाठी पुरेशी यंत्रणा सज्ज केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More