इचलकरंजीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार निदर्शने,संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या,वाल्मिक कराड याच्या प्रतिमेला मारले जोडे
इचलकरंजी:
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि केलेल्या छळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आणि प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सर्वत्र त्या घटनेचे निषेध व्यक्त होत असून इचलकरंजी येथे देखील शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने महात्मा गांधी पुतळा चौकात तीव्र निदर्शने करत संशयित आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली,संतप्त कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराड यांच्या प्रतिमेला जोडे मारले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांच्या मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयपणे आणि त्यांचे छळ करून मारहाण केली. त्याचे फोटो सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांत प्रसिद्ध झाले. त्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड चीड आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शासन करावे अशा तीव्र भावना रविंद्र माने यांनी यावेळी व्यक्त केल्या.यावेळी शिवसेना नेते महादेव गौड, इचलकरंजी शहर शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे व महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.वैशाली डोंगरे,सलोनी शिंत्रे,शकुंतला पाटील,दिप्ती लोकरे,श्रध्दा यवलुजकर, ज्योत्स्ना भिसे, उमा जाधव, समिक्षा कांबळे, उमा जाधव, स्नेहांकिता भंडारे, सोनाली आडेकर, गीता गाठ, मोहन मालवणकर, ऋषिकेश गौड,महेश ठोके, विजय पाटील, सुशिल खैरमोडे, अमोल सुर्यवंशी, मनिष मेटे, संतोष चव्हाण, लखन कांबळे, हेमंत कांबळे, संदीप माने, मुश्ताक मोमीन, प्रताप मस्के, दत्तात्रय हावरे, इकबाल कलावंत, सलीम मुजावर, चंद्रकांत डांगे, उत्तम जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800