डीकेटीई आणि सनबीम इन्फोटेक (सिडॅक) यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार संपन्न
इचलकरंजी:
येथील डीकेटीईने प्रगत संगणकीय आणि सॉफटवेअर प्रशिक्षणात उत्कृष्टतेसाठी नामांकित अशा सनबीम इन्फोटेक प्रा. लि. पुणे (सिडॅक चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र) यांच्याशी शैक्षणिक सहकार्य मजबुत करण्यासाठी सामंजस्य करार संपन्न झाला आहे. संगणक क्षेत्रातील नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या उददेशाने या कराराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या करारामुळे डीकेटीईमधील विद्यार्थ्यांना संगणका मधील नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान, स्कील इन्हॅन्समेंट ट्रेनिंग, इंटरनशिप आणि प्लेसमेंटसाठी मदत होणार आहे.
सध्याच्या बदलत्या काळात पारंपारिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी तांत्रिक कौशल्य प्रशिक्षणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे यामुळेच हा करार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. डीकेटीई व सनबीम यांच्यातील करारामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरमधील उच्च प्रतीचे प्रशिक्षण मिळण्यास मदत होणार असून डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक दृष्टया सक्षम बनविण्यासाठी चालना मिळणार आहे. कॉम्प्युटरमधील आधारीत कौशल्यावर अशा या ट्रेनिंगमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आणि उद्योजक बनण्यासाठी नक्कीच लाभ होणार आहे. यामध्ये सी प्रोग्रॅमींग, डाटा स्ट्रक्चर, कोर व ऍडव्हॉन्सींग जावा प्रोग्रॅमिंग, एम्बीडेड सी, लिनक्स, डीव्हायस ड्रायव्हर प्रोग्रॅमिंग अशा अदययावत कोर्सेस उपलब्ध होणार आहेत.
या सामंजस्य करारामुळे शैक्षणिक शिक्षण आणि उदयोगाच्या गरजांमधील अंतर भरूण काढण्यास मदत होणार असून उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना फायदा होईल तसेच एआय, सायबर सिक्युरीटी, क्लाउड कम्प्युटींग, डेटा सायन्स या सारख्या उच्च मागणी असलेल्या क्षेत्रात कौशल्य अत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना सक्षम केले जाईल असे उदगार डीकेटीईचे कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी यावेळी काढले.
सदर करार हस्तांतरण प्रसंगी डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, सनबीम पुणचे सीईओ नितीन कुडाळे, सनबीम कराडचे संचालक प्रशांत लाड, डीकेटीई च्या डायरेक्टर डॉ.एल.एस.अडमुठे, विभागप्रमुख डॉ.डी.व्ही.कोदवडे, डॉ.एस.के.शिरगावे, डॉ.टी.आय.बागवान, डॉ जे.पी.खरात व तेजश्री रोटे उपस्थित होते.
फोटो ओळी – डीकेटीई व सनबीम इन्फोटेक पुणे यांच्यात सामंजस्य कराराप्रसंगी डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, रवी आवाडे, डॉ. एल.एस.आडमुठे, सनबीमचे सीईओ नितीन कुडाळे व इतर.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800