आपटे वाचन मंदिर येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.
इचलकरंजी:
.श्री. स. सौ. गंगामाई महिलालय व आपटे वाचन मंदिर यांचे संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन अतीशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा दाते, सांगली या होत्या. त्यांनी सर्व स्त्रियांनी स्वत: साठी ३० मिनीटे दिवसाची राखून ठेवावीत. मला काय होत नाही असे वाटत असले तरी वर्षातून एकदा पूर्ण तपासणी करुन घ्यावी व सर्वच गोष्टी मीच करणार हा अट्टाहास सोडून दयावा. कुटुंबातील सर्वांकडे लक्ष हे दयावेच लागते. उत्तम खेळाडू असणाऱ्या प्रसन्न व्यक्तीमत्वाच्या डॉ. शिल्पा दाते यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. कु. वैष्णवी पवार (राष्ट्रीय खो खो खेळाडू), सौ. संगीता हत्तीकटगी (अत्यंसंस्कार सेविका), सौ. कोमल चोथे (एस टी मॅकॅनिकल), सौ. अरुणा पाटील (शितपेय स्टॉल), मा. यल्लवा पुजारी (गायन शिक्षिका (अंध), डॉ. केतकी साखरपे (स्त्री रोग तज्ज्ञ)
यांचा सत्कार करण्यात आला. सर्व सत्कार प्राप्त महिलांनी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या व्यवसायातील कामाबद्दल मन हेलावून टाकणारे अनुभव सांगीतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करणेत आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपटे वाचन मंदिराच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी केले. पाहुण्यांचा परीचय ग्रंथालयाच्या संचालिका सौ. मिनाक्षी तंगडी यांनी करुन दिला. पाहुण्यांचा सत्कार आपटे वाचन मंदिराच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार व श्री. स. सौ. गंगामाई महिलालयाच्या अध्यक्ष सौ. मीना रानडे यांनी केला. यानंतर सन्मान प्राप्त महिलांचा सत्कार डॉ. शिल्पा दाते यांचे हस्ते करण्यात आला. आभार ग्रंथालयाच्या कार्यवाह कु. माया कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचालन श्री. स. सौ. गंगामाई महिलालयाच्या संचालिका सौ. अश्विनी मराठे व सौ. स्वाती मोघे यांनी केले. या कार्यक्रमास दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, संचालक व बहुसंख्य रसिक श्रोते उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800