इचलकरंजीत दोन गटांमध्ये कोयता,काठ्यांनी तुफान हाणामारी – परस्परविरोधी गुन्हे दाखल
इचलकरंजी:
शहरातील सहकारनगर आणि आसरानगर येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. धारदार शस्त्रांचा वापर करून दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, या प्रकरणी दोन्ही गटांच्या ३० हून अधिक जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत फिर्यादी दत्ता तुकाराम देडे (वय ५५, रा. सहकारनगर, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ मार्च रोजी रात्री ८:३० च्या सुमारास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कमान, सहकारनगर येथे आरोपी बच्चन कांबळे याने त्यांच्याशी वाद घालत “तू आमच्या भांडणात का पडतो?” असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर आरोपी व त्याच्या साथीदारांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी फिर्यादीच्या भाच्याला काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच, फिर्यादी यांच्या पुतण्याची स्विफ्ट कार (MH-09-DA-4385) फोडून अंदाजे १०,००० रुपयांचे नुकसान केले. घराजवळील पाण्याच्या बॅरेल फोडून आणखी २,००० रुपयांचे नुकसान करण्यात आले.
या प्रकरणी बच्चन कांबळे, सुमित कांबळे, गणेश कांबळे, प्रेम कांबळे, आदित्य निंबाळकर, यश निंबाळकर, ऋतीक गवळी, अतिष भोसले, समाधान नेटके, शंकर कांबळे, अर्जुन भोसले, रोहन कांबळे, ओंकार ढमणगे, गणेश कांबळे, स्वप्नील तारळेकर आणि साहील (पूर्ण नाव अज्ञात) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या गटातील फिर्यादी आदित्य अविनाश निंबाळकर (वय २०, व्यवसाय: भाजीपाला विक्री, रा. आसरानगर, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ मार्च रोजी सायंकाळी ७:४५ वाजता सुतार मळा, इचलकरंजी येथे त्यांच्यावर गटारी करण्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आला.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार,विष्णु देडे,कार्तिक देडे,संदेश देडे,गोरख तोरडमल,पोपट देडे,धना देडे,आबा देडे,बप्पा देडे,दत्ता देडे,बिभीषण कांबळे,चंद्रकांत कांबळे,ईसा देडे आणि मारुती देडे यांनी काठ्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अनेक आरोपींवर पूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. इचलकरंजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई वाघमारे तपास करत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800