इचलकरंजी महानगरपालिकेची कर वसुली मोहीम तीव्र – थकबाकीदारांवर कडक कारवाई
इचलकरंजी: महानगरपालिकेच्या घरफाळा आणि पाणीपट्टी कर वसुली मोहिमेला गती मिळाली असून थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. दि. १५ मार्च २०२५ अखेर झालेल्या वसुलीचा तपशील महापालिकेने जाहीर केला आहे.
महापालिकेकडून घरफाळा मागणी ७१ कोटी रुपयांची असून त्यापैकी ४२ कोटी २० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच पाणीपट्टी मागणी २८ कोटी रुपये असताना केवळ ५ कोटी ७२ लाख रुपयांचीच वसुली झाली आहे.
थकबाकीदारांवर कारवाई करत १६८ मिळकती सील करण्यात आल्या असून १८४ पाणी कनेक्शने तोडण्यात आली आहेत. तरी, करदात्यांनी त्वरित आपला कर भरावा अन्यथा आणखी कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800