इचलकरंजीच्या ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ नाटकास राज्यस्तरीय प्रथम क्रमांक
इचलकरंजी:
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ७०वा राज्यस्तरीय अंतिम नाट्य महोत्सव भरत नाट्य मंदिर, पुणे येथे नुकताच पार पडला. सदरच्या राज्य स्पर्धेत येथील मनोरंजन मंडळ निर्मित आणि कामगार कल्याण केंद्र, संभाजीनगर कोल्हापूर प्रस्तुत ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत एकूण वैयक्तिक सहा पारितोषिकांसह सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार प्राप्त करणे ही गोष्ट इचलकरंजीच्या कला क्षेत्रासाठी गौरवशाली आहे.
महाराष्ट्राच्या आठ विभागातून अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या २१ नाटकांतून हे नाटक राज्यात प्रथम आले. या बरोबरच दिग्दर्शन प्रथम क्रमांक- पायल पांडे,
पार्श्वसंगीत प्रथम क्रमांक – प्रताप सोनाळे, नेपथ्य प्रथम क्रमांक – निखिल शिंदे, प्रकाश योजना द्वितीय क्रमांक – आशिष भागवत, अभिनय स्त्री द्वितीय क्रमांक – मानसी कुलकर्णी, अभिनय पुरूष तृतीय क्रमांक – संतोष आबाळे असे सहा पुरस्कार या नाटकाने पटकावले.
या स्पर्धेचे परीक्षक या नात्याने प्रभाकर दुपारे नागपूर, गणेश दिघे पुणे, अजय धवने चंद्रपूर आणि मीनाक्षी केंढे व वर्षा वाघमारे पुणे यांनी जबाबदारी पार पाडली. या नाटकाची कथा – राजन खान यांची असून नाट्य रूपांतर – डॉ. प्रमोद खाडीलकर यांनी केले आहे. निर्मिती प्रमुख – प्रकाश रावळ आहेत तर रंगभूषा – सुनीता वर्मा आणि वेशभूषा – स्नेहा वर्मा यांनी केली. रंगमंच सहाय्य – सौरभ पांढरे, अविनाश जोशी, सुशांत सावंत, आकाश हावळ व अनिरुद्ध कुलकर्णी यांनी केले. सदरच्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ या महिन्याच्या शेवटी मुंबई येथे होईल असे कळविण्यात आले आहे.
पुणे येथे अंतिम फेरीत झालेल्या ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकामधील एक दृश्य

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800