आसरानगर मारामारी प्रकरणातील तिघाना भागात फिरवले.
इचलकरंजी:
आसरानगर साईट नंबर १०२ परिसरात दोन गटांत झालेल्या तुफान मारामारी प्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.या प्रकरणातील मुख्य आरोपी बप्पा देढे, विष्णू देढे आणि धना देढे यांना आज तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आले.
सदर हाणामारीत दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ले करत परिसरात तणाव निर्माण केला होता. घटनेनंतर पोलिसांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करत आरोपीना ताब्यात घेतले होते
यातील ३ आरोपीना आज घटनास्थळी नेत तपासासाठी फिरवण्यात आले.यावेळी इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पो.नि.महेश चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800