डीकेटीईमध्ये इन्स्टिटयूट लेव्हल इनोव्हेटीव्ह आयडिया स्पर्धा संपन्न
इचल. ता. २३ः
भारत सरकार इनोव्हेशन सेल, डीकेटीईच्या युक्तीसेल,स्टार्टअप सेल आणि आयडिया लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इन्स्टिटयूट लेव्हल इनोव्हेटीव्ह आयडिया स्पर्धा‘ आयोजित केली होती.ही स्पर्धा विद्यार्थ्यांना नवे प्रकल्प आयडिया सादर करण्यासाठी एक व्यासपीठ देते आणि त्यांचे तंत्रज्ञान,सर्जनशीलता व समस्यांचे निराकारण करण्याच्या कौशल्यांना विकसीत करण्यास मदत करते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला आणि समाजोपयोगी प्रकल्प आयडियाचे सादरीकरण केले.
प्रथम फेरीमध्ये युक्ती समन्वयकांनी इन्स्टिटयूटमधील सर्व ब्रँचेस मध्ये प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांमधून नाविण्यपूर्ण अशा दोन-दोन प्रकल्प आयडियांची निवड केली.त्यानंतर निवड झालेल्या प्रकल्प संघाच्या आयडीयाची द्वितीय फेरीमध्ये परिक्षकांकडून पुन्हा रितसर चाचणी करण्यात आली त्यातून केवळ ४ प्रकल्प अंतीम फेरीमध्ये पोहचले. अंतीम फेरीत निवड झालेल्या ४ प्रकल्पातून तीन संघाची निवड झाली. अशा या सर्व राउंडमध्ये कौशल्य व नाविन्यता या तत्वावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे परिक्षकांनी अभिनंदन केले. स्पर्धेसाठी रेमंड, कागलचे सतीश दिंडे, इंटिग्रे सिस्टीमटाईज, कोल्हापूर चे जयंत देसाई, डीकेटीईचे डॉ सतीश लवटे, डॉ एस.के. पाटील यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
डॉ अश्विनी रायबागी यांच्या मार्गदर्शनाखाली फॅशन टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थी रुतुजा मेटे, स्नेहल तपके, सायली खैरनार, केतन भोसले या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट ऑफ साउंड ऍबसॉर्बींग बायोडिग्रेडेबल टाय नॉट कॅप इनहान्सिंग मेंटल हेल्थ ऑफ न्यू बॉरन्स‘ या प्रकल्प आयडियाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. डॉ व्ही.पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल विभागातील सीवर्कस या टीमच्या अंकिता येरुडकर, निकीता चव्हाण, नुतन पाटील व सानिका संपकाळ या विद्यार्थ्यांंनी ‘वेस्ट हिट रिकव्हरी बाय युजींग सॅडफॅक्टरी स्टोरेज‘ या विषयावर प्रकल्प आयडिया सादर केली. या टीमला द्वितीय पुरस्कारने गौरविण्यात आले.प्रा. उत्कर्ष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसईआय एमएल चे अथर्व पोतदार, उत्कर्ष रिसवडे, पृथ्वीराज पाटील, सार्थक पाटील यांनी सादर केलेल्या ‘मल्टी परपज गेमींग टेबल‘ या प्रकल्प आयडियास तृतीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. डीकेटीईमध्ये नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रेरित करण्यासाठी संशोधनात्मक प्रकल्प स्पर्धाचे आयोजन होत असते. यामध्ये विविध विभागातून ६० संघानी सहभाग नोंदवला होता व आपल्या प्रोजेक्टसचे शिक्षकांसमोर समोर सादरीकरण केले व प्रात्यक्षिक दिले. यामधील निवड झालेले प्रोजेक्टस हे एआयसीटीई आणि मिनीस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल मार्फत घेतल्या जाणा-या देशस्तरावरील स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त, संचालिका प्रा.डॉ. एल.एस. आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर सर्व विभागप्रमुख यांच्या नियोजनाखाली हे प्रदर्शन यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ डी.व्ही. कोदवडे, डॉ.टी.आय.बागवान, डॉ पी.एम.गवळी, प्रा.अनुष्का काडगे यांनी काम पाहिले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800