क्रेडाई इचलकरंजीचा पदग्रहण सोहळा उत्साहात.
इचलकरंजी
क्रेडाई संस्थेला येणा-या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबध्द आहे, असे ग्वाही आमदार राहूल आवाडे यांनी दिल्या. येथील लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात इचलकरंजी क्रिडाई संस्थेचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी आमदार आवाडे बोलत होते. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, अपर तहसिलदार सुनिल शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नूतन पदाधिका-यांनी प्रदग्रहण झाले यामध्ये रणजित लायकर यांनी अध्यक्षपदाचा, तानाजी हराळे व जहिर सौदागर यांनी उपाध्यक्षपदाचा, राजू पाटील यांनी सचिवपदाचा, राजेंद्र खंडेराजुरी यांनी कोषाध्यक्षपदाचा, शिवकुमार हिराणी यांनी सहसचिवपदाचा तर दादासो भाटले यांनी सहकोषाध्यक्षपदाचा पदभार घेतला.
माजी आमदार हाळवणकर यांनी क्रिडाई संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, २०२३ पासून मी सतत क्रिडाई संस्थेच्या पदग्रहण सोहळ्यास उपस्थीत राहत आलो आहे. क्रिडाईमुळे इचलकरंजी शहराला साचेबध्द अशी बांधकामे केली जात असून त्यातून लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आहे.
नूतन अध्यक्ष लायकर यांनी इचलकरंजीत वास्तू प्रदर्शन दर्जेदार पध्दतीने घेण्यात येईल व बांधकाम क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. शहराच्या पाणी प्रश्न साडविण्याबाबत त्यांनी आमदार आवाडे यांचे लक्ष वेधले. त्याबाबत आमदार आवाडे यांनी पाणी प्रश्न सोडविण्यसाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत एक दिवस आड पाणी देण्यात येईल, असे सांगितले.
प्रारंभी पहलगाम अतिरेकी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सल्लागार नितीन धूत यांनी केले. त्यांनी क्रिडाई संस्थेची थोडक्यात माहिती दिली. क्रिडाई, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी क्रिडाई, महाराष्ट्राच्या उपक्रमांची माहिती दिली. सचिव आशिष पोकरणा यांनी क्रिडाई महाराष्ट्राच्या कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक मयूर शहा यांनी केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी नगरसेवक जयवंत लायकर उपस्थित होते. आभार सूचन सचिव राजू पाटील यांनी मानले.सुत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद गफारी, यशवंत राठोड, चंद्रकांत भागाजे, विकास चंगेडीया, साजीद बेडकाळे, पवन डाळ्या, विजय गलगले, विठ्ठल तोडकर, सम्मेद मगदूम, प्रितीश शहा, मोहित गांधी, सौरभ जाधव, इब्राहीम काझी, अॅड. अमित सिंग, मितेश बलवान, प्रथमेश मेटे, हितेश सालेचा आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ – इचलकरंजी ः क्रिडाई संस्थेच्या पदग्रहण सोहळ्याप्रकरणी आमदार राहूल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अपर तहसिलदार सुनिल शेरखाने यांच्यासह नूतन अध्यक्ष रणजीत लायकर, मार्गदर्शक नितीन धूत, विद्यानंद बेडेकर, आशिष पोकरणा, मयुर शहा सय्यद गफारी, तानाजी हराळे, जहिर सौदागर, राजू पाटील, आदी

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800