ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात धाकल्या पाटलांच्या बैलाने तोडला कर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात धाकल्या पाटलांच्या बैलाने तोडला कर


इचलकरंजी-
वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. तर  सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे १२० वर्षाची परंपरा असलेला  मानाचा पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला. धाकल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला तर पाऊसमान चांगले होते अशी आख्यायिका आहे.
शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला.
Advt
त्याचबरोबर घरोघरी मातीचे बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून मनोभावे पुजा करुन  पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळीराजाने गर्दी केली होती. सकाळपासून बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येत होती. शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला.
सायंकाळी शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे चाललेल्या परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्यावतीने गावभागातील महादेव मंदिरनजीक पारंपारिक पध्दतीने कर तोडण्याचा कार्यक्रम देवाशिष पाटील, शिवांशिष पाटील यांच्या हस्ते पार पडला. तत्पूर्वी उत्सव कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती व जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, क. आ. जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे आदी मान्यवरांचे हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
लाकूड ओढणे शर्यतीत मोठ्या गटात सौरभ आनंदा माने (प्रथम), प्रथमेश विनायक गायकवाड (द्वितीय), श्रृतेश सुभाष चौगुले (तृतीय) तर लहान गटात रुपचंद बंडगर (प्रथम), तुषार आरबोळे (द्वितीय) व महादेव पाटील (तृतीय) यांच्या बैलांनी यश मिळविले. सुट्टा बैल पळविणे स्पर्धेमध्ये बाशा ग्रुप च्या बैलाने प्रथम, सरदार बैल ग्रुपच्या बैलाने द्वितीय तर गुरु काशिलिंग नांदणी यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळविला.
याप्रसंगी उत्तम आवाडे, प्रकाश दत्तवाडे, किशोर पाटील, गंगाधर होसकोटी (हलकर्णी), शेखर शहा, बाबू रुग्गे, तानाजी भोसले, काशिनाथ गोलगंडे, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, संजय केंगार, प्रशांत कांबळे, राजू पुजारी, शशिकांत नेजे, आशिष पाटील,
 आदिसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदु पाटील, खजिनदार अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांतापा मगदूम, राहुल घाट, सागर मगदूम, शिवाजी काळे, राजेंद्र दरीबे, बजरंग कुंभार, डॉ. विजय माळी, सागर गळदगे, इरफान आत्तार, सागर कम्मे, अरिफ अत्तार, इरफान अत्तार आदींसह गावकामगार पाटील, पोलिस पाटील यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केले.
बक्षिस वितरण करताना कल्लाप्पाण्णा आवाडे,आ. राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे,स्वप्निल आवाडे, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा