ICHMH51NEWS.IN
9921600800

जाणते लोकप्रतिनिधी महापालिकेत पाठवण्याची इनामची जबाबदारी.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जाणते लोकप्रतिनिधी महापालिकेत पाठवण्याची इनामची जबाबदारी.

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेत चांगले व जाणते लोकप्रतिनिधी पाठवणे हेच इनामचे उद्दिष्ट असुन शहरातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर व कार्यक्षम प्रामाणिक नगरसेवक निवडण्याची जबाबदारी इनामची असेल त्यासाठी अजून बैठका घेऊन ठोस भूमिका ठरवण्यात येईल असे इनामच्या आढावा बैठकीत ठरवण्यात आले.
इच्छुक उमेदवार सौ.राधा अमितकुमार बियाणी व राम आडकी यांनी इनामच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याबाबत तयारी दाखवली त्याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.
यावेळी अतुल निटवे,डॉ.सुप्रिया माने,विजय देसाई,प्रा.सचिन बेलेकर,चंद्रकांत मांगलेकर, दयानंद लिपारे,राजु कोन्नुर,उमेश पाटील,अँड एस बी सावेकर,अभिजित पटवा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पक्ष गट तट न बघता काम करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देणे,मतदान जागृती मोहिम राबवणे,नागरी प्रश्न अजून जोमाने हाताळणे,युवा पिढीला जागृत करणे,आर्थिक अमिष दाखवून निवडणूक लढण्यामुळे सुशिक्षित नागरिक निवडणुकीपासून दूर जात असून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे असे निर्णय घेण्यात आले.
आचार संहिता लागल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी व्यापक बैठक घेण्याचे ठरवण्यात आले.यावेळी इनामचे सदस्य उपस्थित होते,सूत्रसंचलन राजु कोन्नुर यांनी केले.
बैठकीत मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत मांगलेकर,अँड एस बी सावेकर समोर उपस्थित इनाम सदस्य
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा