शोषित, पिडीत, वंचित व कामगार महिला-पुरुषांना समान हक्क जरुरीचे-मा. जिल्हा न्यायाधिशसोो जे. एल. गांधी
इचलकरंजी:
हातकणंगले विधी सेवा समिती व दि इचलकरंजी बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन्मती मतिमंद विकास केंद्र, इचलकरंजी येथे आयोजित पालक मेळाव्यास विधी सेवा समितीचे अध्यक्ष मा. जिल्हा न्यायाधिशसो, जे.एल. गांधीसा यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिनी व दिव्यांग सप्ताहनिमित्त विधी सेवा समिती द्वारा आयोजित सदर कार्यक्रमात मा. जिल्हा न्यायाधिशसोो श्री. गांधीसो व मा. जिल्हा न्यायाधिशसा मिलींद भोसलेसोो यांचे प्रेरणेने १२ विद्यार्थ्यांना दत्तक घेणेत आले.
सदर कार्यक्रमात अॅड. प्रिती पटवा मॅडम यांचा सत्कार मा. जिल्हा न्यायाधिशसो श्री. गांधीसा यांचे हस्ते करणेत आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.जे. बडबडे, सचिव संजय कोले, डॉ. कुबेर मगदूम, किरण गॅस एजन्सीचे हिराचंद बरगाले, नॅचरल ग्रुपचे श्रीवल्लभ बांगड, संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक, पालक व विद्यार्थी उपस्थित हाते.
कार्यक्रमाचे नियोजनास दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, क्लार्क प्रविणभाऊ फगरे, विधी सेवा समितीचे ज्ञानेश्वर मिरजकर, अभिजीत माने व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सदस्यांचे व सन्मती मंतिमंद विकास केंद्राचे सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.
मनोगत व्यक्त करताना न्या.जे.एल.गांधी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







