ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत १ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन इचलकरंजी :

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत १ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी :

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने व माध्यम प्रायोजक दै. महासत्ता यांच्या सहकार्याने दि. १ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान रोटरी ट्रेडफेअर २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक असलेल्या केएटीपी (KATP) ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यंदा या ट्रेडफेअरचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष असून, इचलकरंजी व परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारणार आहे.

Advt

या ट्रेडफेअरमध्ये इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू, गृहउपयोगी उत्पादने, गारमेंट मशिनरी, टू-व्हिलर बाईक, वॉटर प्युरिफायर, लेडीज व जेंट्स ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, एज्युकेशन, सोलर, अॅक्युप्रेशर बॉडी मसाज, व्यायामाची साधने, आयुर्वेदिक उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, विविध प्रकारचे मसाले व मुखवास आदींचे स्वतंत्र विभाग असणार आहेत. न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्स, शिवम इंटरप्रायजेस, सोलर टेक्नॉलॉजी, श्रीजी निटींग, इंडस्ट्रियल, किचन ट्रॉलीज, युरेका फोर्ब्स, सुर्या वॉटर, पितांबरी, सीडब्ल्यूएच टेक्नॉलॉजी, सोफा फर्निचर, बेंगलोर साडी यांसह अनेक नामांकित कंपन्या व फर्मचे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी, अत्यंत लज्जतदार व हायजेनिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थांचे विविध फूड स्टॉल्स, आईस्क्रीम स्टॉल्स तसेच नागरिकांच्या मनोरंजनासाठी दररोज स्टेज शो, कराओके गाणी, मिमिक्री कार्यक्रम आणि मुलांसाठी मिनी वर्ल्ड असणार आहे. ट्रेडफेअर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेश कुपनवर दररोज लकी ड्रॉ काढण्यात येऊन आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

महिलांसाठी मेहंदी, टाकाऊपासून टिकाऊ, पाककला व संक्रांत सजावट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या ट्रेडफेअरमधून मिळणारी रक्कम वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.

या प्रदर्शनासाठी सुबक स्टॉल मांडणी, प्रशस्त जागा, आधुनिक भव्य मंडप, संपूर्ण परिसर मॅटने आच्छादित, चोवीस तास सुरक्षा व्यवस्था व सीसीटीव्ही यंत्रणा करण्यात आली आहे.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष संजय घायतिडक, सेक्रेटरी पिरगोंडा (राजू) पाटील, रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन पंकज कोठारी, सेक्रेटरी सुनील सातपुते, प्रोजेक्ट को-चेअरमन सत्यनारायण धुतमहादेव खारगेसंजय खोतमनिष मुनोतप्रकाश गौडनेमिनाथ कोथळेवसंत पाटीलमहेंद्र मुथाअभय यळरूटेसुशील माहेश्वरीराजाराम जाधवअजित कुरडेप्रकाश रावळसुनील यळरूटेविक्रम बुचडेशरद देसाईश्रीनिवास दबडेमुकुंद माळी आदी रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

पत्रकार परिषदेत माहिती देताना पंकज कोठारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा