ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबसच्या वतीने नाट्य अभिवाचन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी सेन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबसच्या वतीने नाट्य अभिवाचन.

   इचलकरंजी
  इचलकरंजी येथील रोटरी प्रोबसच्या वतीने जेष्ठ नाटककार श्री रत्नाकर मतकरी लिखित ट्रॅप अर्थात सापळा या नाटकाचे अभिवाचन कार्यक्रम आपटे वाचन मंदिराचे संचालक श्री. संजय सातपुते व सौ.मिनाक्षी तंगडी यांनी आपल्या वैविध्यपूर्ण आविष्काराने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले,शब्दांची अचूक फेक, आवाजातील चढ-उतार, भावुकता आणि स्वकीयांचा विश्वासघात अशा विविध पैलूनी असलेल्या या नाटकाच्या कसदार अभिवाचनाने एक नाट्याविष्कार रसिकांनी अनुभवला.
    प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सह-सेक्रेटरी सौ.संगिता लडगे यांनी केले,अभिवाचक कलाकार श्री संजय सातपुते यांचा परीचय श्री काशिनाथ जगदाळे तर सत्कार संस्थापक अध्यक्ष प्रकाश सातपुते यांनी केला  तर सौ.मिनाक्षी तंगडी यांचा परिचय सौ.विना श्रेष्ठी यांनी करून दिला व सत्कार सौ. मनीषा कोष्टी यांनी केला.
प्रास्ताविक सेक्रेटरी श्री किरण कटके यांनी केले,तर अध्यक्ष श्री सुनिल कोष्टी यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख उपस्थिती रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी श्री प्रकाशराव सातपुते यांची होती.
या कार्यक्रमाला ॲड.विश्वासराव चुडमुंगे, रामचंद्र निमणकर, विजय पोवार,माधवी कुलकर्णी, अशोक पाटील, मनिषा कोष्टी, नंदा लकुन्द्रे, आनंदी हजारे, अस्मिता कांबळे, सुषमा थोरवत,द्राक्षायणी लाटकर,डेझी कुरणे, दिपाली कोळी, दिलीप शेट्टी, वैभव डोंगरे,निता दोड्डन्नावर, निर्मला मोरे, डॉ.कुबेर मगदुम, अरुंधती सातपुते, ज्ञानदेव मेटे, प्रदिप लडगे, विजयकुमार सोनी, सुशिला सोनी, प्रकाश अकीवाटे वैशाली पाटील, सर्जेराव घोरपडे, जयप्रकाश शाळगावकर, हिमांशू मिरगे, विश्वनाथ एकार, शशिकला एकार, काशिनाथ टकले, गजानन शिरगुरे,प्रमोदिनी देशमाने, विजय बनसोडे, सुर्यकांत बिडकर, कैलास तिवारी, आप्पासाहेब कुठचे, प्रमोद लाटणे, बाबासाहेब पाटील, जांभळीकर,डी.एम.बिरादार, बाबासाहेब हावले, इत्यादी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सेक्रेटरी किरण कटके यांनी मानले.
नाट्य अभिवाचन प्रसंगी प्रकाश सातपुते,सुनील कोष्टी,मीनाक्षी तंगडी व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा