ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी क्लबतर्फे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे आजपासून आध्यात्मिक प्रवचन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी क्लबतर्फे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे आजपासून आध्यात्मिक प्रवचन

इचलकरंजी :

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व श्री गुरुदेव आध्यात्मिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कणेरी मठाचे अधिपती परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या चार दिवसीय आध्यात्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रवचने सोमवार दि. १५ ते गुरुवार दि. १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहेत.

हे प्रवचन रोटरी श्रीमती सोनीदेवी रामबिलास बाहेती सेवा केंद्र, महेश सेवा समिती जवळ, इचलकरंजी येथे दररोज सायंकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत होणार आहेत. या चार दिवसीय प्रवचनमालेत स्वामीजी “पंच परिवर्तनातून राष्ट्रनिर्माणाकडे” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या आध्यात्मिक प्रवचनांचा लाभ इचलकरंजी शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व श्री गुरुदेव आध्यात्मिक केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा