ICHMH51NEWS.IN
9921600800

डी.के.टी.ई. मध्ये ‘टेक-सिंपोझियम २६‘ आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक स्पर्धा उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डी.के.टी.ई. मध्ये ‘टेक-सिंपोझियम २६‘ आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक स्पर्धा उत्साहात संपन्न

इचल:
अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी उद्योगजताशी नाते जोडले पाहिजे. तांत्रिक कौशल्याबरोबरच आत्मविश्‍वास, नवोन्मेषी विचार आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होण्यासाठी टेकसिम्पोंझिएम सारख्या आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरतात तसेच अभियंत्यांना ज्या उद्योगजगतात काम करायचे आहे त्याची ओळख व्हावी व कॅम्पस इंटरव्हयू देत असताना त्यांना आत्मविश्‍वास यावा यासाठी टेक-सिंपोझियम सारख्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आपल्या तांत्रिक कलेस वाव देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन टेक महिंद्रा, पुणे येथील हेड फे्रशर अ‍ॅण्ड ट्रेनिंग उमेश गांजले यांनी केले. ते डीकेटीई येथे आयोजित ‘टेक-सिंपोझियम २०२६‘ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी सिनर्जी ग्रीन, कागल चे एक्झुकीटीव्ह डायरेक्टर श्रीनिवासा रेडडी यांनी आपल्या मनोगतात, अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी व कार्यसंस्कृती याबाबत मार्गदर्शन केले. तांत्रिक ज्ञानाबरोबर शिस्त, टीमवर्क आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच उद्योगाच्या अपेक्षा लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी स्वतःची तयारी करावी असे त्यांनी सांगितले.
टेकसिंपोझियम- २६ ही स्पर्धा विद्यार्थ्यांची तांत्रिक प्राविण्य, सॉफट स्किल, अ‍ॅप्टीटयूड आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसीत करणारे प्रभावी व्यासपीठ ठरली. विविध महाविद्यालयांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमुळे ज्ञान,कल्पना आणि अनुभवांची समृध्द देवाणघेवाण झाली आणि संपूर्ण वातावरण तांत्रिक उत्साहाने भारुन गेले.
या कार्यक्रमाचे उदघाटन ऑडीटरीएम हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन पार पडले. हयावेळी संस्थेच्या डायरेक्टर डॉ एल एस आडमुठे, डीन, व सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित होते. मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ व्ही.आर.नाईक यांनी स्वागत केले व विभागप्रमुख एआयडीएस डॉ.टी.आय.बागबान यांनी स्पर्धेचा उद्देश व हेतू स्पष्ट केला, स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा.पी.एम.मठपती यांनी काम पाहिले.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांना चालना मिळावी यासाठी डीकेटीई तर्फे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. सीएसई, एआयएमएल व डेटा सायन्स विभागांनी कोडक्षेत्र, हॅकॅथॉन मध्ये ए.आय. टेक्नीक्सचा वापर करुन कोडिंगचे आयोजन केले. सिव्हील विभागाने कॅड नोव्हा आणि सर्व्हे स्प्रिंटचे आयोजन केले होते.ज्यामध्ये स्ट्रक्चरल आणि विश्‍लेषणात्मक कौशल्यांची चाचणी घेण्यात आली. ईएनटीसी रोबोतंत्र आणि इकोकॅनव्हॉज पोस्टर प्रेंझटेशन,  इलेक्ट्रीकल विभागामार्फत इथ्री इव्हेंट व चॅलेंजमॅनिया इव्हेंट. मेकॅनिकल विभागामार्फत मेकफिट आणि फनोमेक मॉडेलिंग कौशल्यावर चे आयोजन केले होते. एमसीए रिब्लीड द हायरिंग सिम्युलेशन अशा  विविध स्पर्धांमध्ये एकूण १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमात विविध टेक्नीकल स्पर्धेमध्ये डीकेटीईचे विद्यार्थी अग्रेसर होते. सर्व अभियांत्रिकी शाखांमधील द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.
फोटो ः डीकेटीईमधील ‘टेक-सिंपोझियम २०२६‘ तांत्रिक स्पर्धेमध्ये रोबोटचे सादरीकरण करीत असताना विद्यार्थी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा