कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची अभ्यास भेट
इचलकरंजी ता.९ समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाला श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या बी.ए.भाग दोन व तीन मधील मराठी विषयाच्या विद्यार्थिनींनी भेट दिली. यावेळी त्यांनी समाजवादी प्रबोधिनीचे व प्रबोधन वाचनालयाचे सर्व कामकाज जाणून घेतले. ही अभ्यास भेट समाजवादी प्रबोधिनी आणि कन्या महाविद्यालयातील मराठी विभाग यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ. त्रिशला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभाग प्रमुख डॉ. अनिता आंबोकर, डॉ प्रतिभा पैलवान यांनी विद्यार्थिनींसह ही भेट दिली. यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. डॉ.अनिता आंबोकर यांनी या अभ्यास भेटीचा उद्देश स्पष्ट केला. सौदामिनी कुलकर्णी, कविता डांगरे, मानसी तगारे यांनी प्रबोधन वाचनालयाच्या मुक्तद्वार वाचनालय ते संदर्भ ग्रंथ विभागापर्यंत सर्व विभागांची माहिती दिली. यावेळी संपदा खराडे, श्रेया बन्ने, प्रियंका जाधव,नंदिनी माने, गौरी वायचळ, सानिका कांबळे, प्रांजल ठोके, अनुराधा कांबळे, कु. नाज फकीर, कु. अनिता खोत, तृप्ती करडे, सानिका शहापुरे या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. डॉ. प्रतिभा पैलवान यांनी आभार मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







