कामगार नेते शामराव कुलकर्णी यांचे निधन
इचलकरंजी:
महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष व राष्ट्रीय प्रशिक्षण कामगार संघटनेचे सचिव शामराव श्रीपाद कुलकर्णी (वय ७८) यांचे रविवारी निधन झाले. काँग्रेस पक्षात त्यांनी बरीच वर्षे काम करत शहर सरचिटणीस व स्वीकृत नगरसेवक म्हणून जबाबदारी सांभाळली. कामगार नेते म्हणून त्यांची ओळख होती. कामगार चळवळीतून त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे. पंचगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







