पुरस्काराचा जबाबदारी स्वरूपात स्वीकार-खा.मेधा कुलकर्णी
इचलकरंजी-
येथील शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानच्यावतीने प्रथमच सुरू करण्यात आलेल्या श्रीमंत अनुबाई घोरपडे सरकार व श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार पुरस्कारांचे वितरण सोहळा फोर्च्युन प्लाझा येथील दरबार हॉलमध्ये दिमाखात पार पडला. या सोहळ्यात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी व विवेक देशपांडे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवृत पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रतिष्ठानचे कार्यवाह शुभंकर फाटक यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत पुरस्कार स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. कोणाही जीवाचा न घडो मत्सर हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून समाजहिताचे कार्य करणाऱ्यांना गौरविण्यासाठी हे पुरस्कार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर निवृत्त पोलिस अधिकारी प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पुरस्कारार्थींना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. पुरस्कार स्वीकारताना खासदार मेधा कुलकर्णी व विवेक देशपांडे यांनी कृतज्ञता व्यक्त करत, या सन्मानामुळे सामाजिक कार्याची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना व्यक्त केली. तसेच अशा पुरस्कारांमुळे पुढील कार्यासाठी प्रेरणा व पाठबळ मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास सहकार भारतीच्या अध्यक्षा वैशाली आवाडे, नगरसेविका रूपा बुगड, पंचायत समिती सदस्या गौराबाई काडाप्पा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रमा फाटक यांनी मानपत्राचे वाचन केले, तर तुकाराम चिंचलीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष आपटे यांनी केले.
यावेळी नगरसेवक मनोज हिंगमिरे,बाळकृष्ण तोतला, दीपक पाटील, महेश पाटील, शुभम बर्गे, उमाकांत दाभोळे आणि दीपक राशिनकर, शिवजी व्यास, अरविंद कुलकर्णी आदींसह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा.मेधा कुलकर्णी व विवेक देशपांडे यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर घेतलेले छायाचित्र सोबत प्रविण दिक्षीत, सुरेश हाळवणकर,वैशाली आवाडे, रमा फाटक व मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







