दहन-दफन निधी योजना पुन्हा सुरू होणार
इचलकरंजी
इचलकरंजीत मोफत दहन-दफन निधी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ३० एप्रिलच्या महासभेच्या विषयपत्रिकेत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मंजुरीनंतर त्वरित अंमलबजावणीसाठी प्रशासनाने ६० लाखांची तरतूद केली आहे. वाढत्या महागाईमुळे अंत्यसंस्काराचा खर्च वाढल्याने ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी सातत्याने केली होती. महापौर, आयुक्त, उपमहापौर व विरोधी पक्षनेते यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रस्तावाला गती मिळाली. मंजुरीनंतर नागरिकांना दहन-दफनासाठी आर्थिक मदत मिळणार असून, प्रक्रिया सुलभ व पारदर्शक ठेवण्यावर भर राहणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







