ICHMH51NEWS.IN
9921600800

सुत दरवाढीविरोधात केंद्राकडे कारवाईची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सुत दरवाढीविरोधात केंद्राकडे कारवाईची मागणी

इचलकरंजी :
सुत गिरण्या व सुत व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या अनैसर्गिक दरवाढीविरोधात इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग व सचिवांकडे कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात मागील १५-२० दिवसांत सुताच्या दरात प्रति किलो ३० ते ५० रुपयांची वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतक्या अल्पावधीत झालेली ही वाढ अभूतपूर्व असून, त्यामुळे कापड उद्योग कोलमडण्याच्या स्थितीत पोहोचला आहे.
वाढलेल्या दरात उत्पादन व विक्री अशक्य झाल्याने कारखाने आठवड्यात चार दिवस बंद ठेवावे लागत आहेत. परिणामी, उद्योग व कामगारांवर गंभीर आर्थिक संकट आले आहे. कापसाचे दर, वीज व वेतन स्थिर असतानाही दरवाढ होत असल्याने ही सट्टेबाजी व नफेखोरी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. साठेबाजी रोखून बाजार स्थिर करण्यासाठी केंद्राने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा