ICHMH51NEWS.IN
9921600800

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डेंटल असोसिएशन व इनामतर्फे बसस्थानक परिसरात वृक्षारोपण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डेंटल असोसिएशन व इनामतर्फे बसस्थानक परिसरात वृक्षारोपण

इचलकरंजी:
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) इचलकरंजी शाखा  व इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने इचलकरंजी एस.टी. बसस्थानक परिसरात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. “हिरवी पृथ्वी, निरोगी स्मितहास्य” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपक्रमाच्या आयोजनासाठी एस.टी. महामंडळाचे आगार व्यवस्थापक सागर पाटील, इचलकरंजी महानगरपालिकेचे स्वच्छ भारत अभियान नोडल अधिकारी उमेश कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच नगरसेविका अरुणा बचाटे व प्रमोद बचाटे यांनी त्वरित पुढाकार घेऊन महानगरपालिकेमार्फत वृक्षारोपणासाठी झाडे उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमास नगरसेविका ध्रुवती दळवाई यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच राम आडकी,अतीत आडकी, हिरामणी आडकी यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी डॉ. महेंद्र शहा, नोडल ऑफिसर उमेश कांबळे आणि इनामचे अध्यक्ष अभिजित पटवा यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करणारे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहा.वाहतूक निरीक्षक शिवाजी धारवट यांनी आभार मानले.
या उपक्रमास आयडीए इचलकरंजी शाखेचे डॉ. शुभम छाजेड,डॉ. प्रियांका जाधव, स्वाती महेंद्र शहा यांच्यासह इनामचे राजू कोन्नूर,शीतल मगदूम, प्रसाद कुलकर्णी, उमेश पाटील,हरीश देवाडिगा, विद्यासागर चराटे,दीपक जाधव,दीपक पंडित,महेंद्र जाधव,अमोल ढवळे,अमित बियाणी,रोहित पालके,शुभम व्यास,सुप्रिया माने,अनिता दळवी,मीना कासार,आदी उपस्थित होते.
वृक्षारोपणासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. एस.टी. महामंडळाच्या वतीने आगार व्यवस्थापक सागर पाटील,वाहतूक निरीक्षक शिवाजी धारवट, वरिष्ठ लिपिक परेश पै व चंदू जाधव यांनी सहभाग घेतला.
वृक्षारोपण दरम्यान डेंटल असोसिएशन,इनाम,इमनपा व इस टी आगाराचे पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा