ICHMH51NEWS.IN
9921600800

बेजबाबदार परिवहन प्रशासनाविरोधात शिवसेनेची जोरदार निदर्शने

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बेजबाबदार परिवहन प्रशासनाविरोधात शिवसेनेची जोरदार निदर्शने

इचलकरंजी :

खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय, भरमसाठ तिकीट दर तसेच नियमबाह्य व धोकादायक मालवाहतुकीच्या वाढत्या प्रकारांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

इचलकरंजीतून महाराष्ट्रासह इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीला अधिक प्राधान्य देत असल्याच्या तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच शहरात क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणारी व धोकादायक मालवाहतूक करणारी वाहने सर्रास फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने परिवहन कार्यालयासमोर निदर्शने करून अधिकाऱ्यांना जाब विचारला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी संबंधित बस व मालवाहतूक वाहनांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. प्रवाशांची होत असलेली वाताहत थांबवावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलनात माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी, शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख मंगल मुसळे, तालुकाप्रमुख शोभा गोरे, माजी नगरसेवक मनोज भाट, अभिजित लोले, सागर जाधव, रतन वाझे, संतोष लवटे, अरविंद मस्के, मेहबूब पठाण, विजय जोशी, शीतल मगदूम, गणेश जंगटे, लक्ष्मी बुरले, स्नेहल मस्के, स्नेहा दरीबे, सकिना भाट, शोभा माने,यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

आंदोलनादरम्यान प्रशासनाशी खडाजंगी उडाली तो क्षण

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा