पदमा लॉन्ड्री–संत नामदेव मैदान–नाईक कॉर्नर मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
इचलकरंजी :
शहरातील पदमा लॉन्ड्री–संत नामदेव मैदान–नाईक कॉर्नर हा वर्दळीचा मार्ग मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दाभोळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, हा मार्ग शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणारा असून परिसरात दोन ते तीन मोठी रुग्णालये असल्याने रुग्णवाहिका, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र रस्त्यावर पडलेल्या मोठ्या व लहान खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या भागात दाट झाडी असल्याने डांबरी रस्ता वारंवार खराब होत असून पावसाळ्यात समस्या अधिक गंभीर बनते. त्यामुळे तातडीने पॅचवर्क करून खड्डे बुजवावेत तसेच कायमस्वरूपी उपाय म्हणून या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800


