अल्पवयीन मुलीवर अत्याचार युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
इचलकरंजी :
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात तन्मय विक्रम बनसोडे (वय २२, रा. तोरणानगर, शहापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिच्याशी संबंध ठेवून विविध ठिकाणी नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे धमकी देणे व लग्नास नकार दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800


