अन्न भेसळीवर कारवाई सुरू पण सूत भेसळीवर कारवाई कधी?- विनय महाजन
इचलकरंजी
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांनी संपुर्ण राज्यात अन्न भेसळीवर कडक कारवाई सुरू केली आहे त्यामुळे भेसळखोरांची पळता भुई थोडी झाली आहे कारण अन्नात भेसळ म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणे व अश्या भेसळखोर वर कडक कारवाई झाली पाहिजे
परंतु सुती धाग्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे याची वारंवार तक्रार करून देखील या वर मात्र कोणतीही कारवाई होत नाही
वस्त्रोद्योग आयुक्त यांनी सूत भेसळीची त्वरित दखल घेऊन या बाबत योग्य व त्वरित तपासणी सुरू करावी व यंत्रमागधारकांना होणाऱ्या मोठ्या नुकसानी पासून वाचवावे कारण यंत्रमागधारक सर्वच बाजूने अडचणी ने घेरलेला आहे व त्यातच सूतात भेसळ मोठ्या प्रमाणात होत असलेल्या तक्रारी येत आहेत म्हणून यावर त्वरित तपासणी होऊन त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या वर कडक कारवाई व्हावी अशी मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष
विनय सीताराम महाजन यांनी केली आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800


