घरासमोरील वादातून लोखंडी अँगल व काठीने हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल
इचलकरंजी :
घराच्या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकणे आणि वाहन उभे करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून कपिल पाटील याच्यावर लोखंडी अँगल व काठीने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि. १३) सकाळी इचलकरंजीतील योगायोगनगर परिसरात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कपिल लालासाहेब पाटील (वय ४१, रा. योगायोगनगर, इचलकरंजी) यांच्या घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवण्यात आले होते. त्याचवेळी गवंडी कामगाराने दुचाकी रस्त्यावर उभी केल्याने शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला.
या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपी आदर्श बाळासाहेब लोंढे (वय २८) याने लोखंडी अँगलने फिर्यादीच्या डोक्यावर वार केल्याचा, तर सचिन वसंत लोंढे याने काठीने पाठीवर मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेत कपील पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800


