इचलकरंजी मनपास्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
इचलकरंजी :
२०२४-२५ या वर्षातील शालेय शासकीय जिल्हास्तर मनपा कॅरम स्पर्धेची सुरुवात श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे आजपासून १४, १७ व १९ या वयोगटातील मुला-मुलींच्या कॅरम स्पर्धांना सुरुवात झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मार्गदर्शक प्रा. शेखर शहा सर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, क्रीडा पर्येवेक्षक सचिन खोंद्रे, आकाश माने, गुरव सर, माळी सर,बंडगर सर,बरगाले सर ,मणेर सर ,अमर भिसे ,शाम कांबळे सर ,अमीत कुंडले यांचेसह शहरातील सर्व शाळेचे कीडाशिक्षक, मार्गदर्शक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा समन्वयक गणेश बरगाले ,आभार तुषार जगताप यांनी मांडले स्पर्धेत विविध शाळेतील २६० हून अधिक खेळाडू सहभागी झाले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800