नाईट कॉलेजमध्ये ‘मुक्तविचार’ अंक प्रकाशन समारंभ व कार्यशाळा संपन्न.
इचलकरंजी :
पत्रकारांनी निर्भीडपणे व प्रामाणिकपणे पत्रकारिता करावी तसेच समाजाला जागृत करण्याचे महत्वाचे कार्य तसेच शोषण विरहित समाज निर्माण करणे,समाजाचे विचार सकारात्मकपणे परिवर्तन करणे.वैचारिक ताकत असेल तर सकारात्मक विचार समाजामध्ये नेहमी पोहोचत असतात.पत्रकारांनी वाचन,चिंतन करून अभ्यासपूर्णपणे पत्रकारिता करणेची गरज आहे.असे मत नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. विरूपाक्ष खानाज यांनी देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र येथील बी.ए.एम.सी.जे.(पत्रकारिता)भाग३ (बी.ए.जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या शिक्षणक्रम) आयोजित ‘मुक्त विचार’ अंक प्रकाशन सोहळा व एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्या कार्यशाळेत प्राचार्य डॉ.विरूपाक्ष खानाज यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार पंडित कोंडेकर हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्ये अवगत करून आधुनिक पत्रकारिता करताना वाचन चिंतन मनन करून अभ्यासपूर्ण मांडणी करावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षास पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी एमसीजी भाग 3 या विद्यार्थ्यांनी प्रायोगिक ‘मुक्तविचार’ या अंकांचे प्रकाशन करण्यात आले समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते
करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मुक्त विद्यापीठाचे केंद्रसंयोजक म्हणून प्रा.डॉ.रामेश्वर संपकाळ,मराठी विभाग प्रमुख प्रा.एफ.एन.पटेल पत्रकार दयानंद लिपारे उपस्थित होते.त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी नीता पाटील व जमीर पठाण यांनी मनोगत व्यक्त केले.तीन वर्षांमध्ये महाविद्यालयामध्ये शिकत असताना आलेले अनुभव महाविद्यालयाविषयी व मार्गदर्शक प्राध्यापकांविषयी आपुलकी चे विचार व्यक्त केले .
सतीश महाकाळे प्रा.शारदा पाटील,डॉ बिरनाळे प्रा.अर्जून पाटील,निकेतन कांबळे उपस्थित होते तसेच कार्यकमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सुरज नदाफ यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय जमीर पठाण यांनी करून दिला.कार्यक्रमाचे आभार ऋषिकेश जगताप यांनी केले सूत्रसंचालन जमीर पठाण व नीता पाटील यांनी केले.डॉ.संदेश पाटील तसेच प्रिया पाटील,शहाहुसेन मुल्ला मयूर चिंदे,दिलीप शिरढोणे,मेहबूब मुजावर उपस्थित होते.
फोटो-
मुक्तविचार अंकाचे प्रकाशन करताना पंडित कोंडेकर,प्राचार्य विरुपाक्ष खानाज व इतर

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800