डीकेटीईमध्ये एमसीए – मास्टर ऑफ कम्पुटर ऍपलिकेशन या नविन पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मुहुर्तमेढ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईमध्ये एमसीए – मास्टर ऑफ कम्पुटर ऍपलिकेशन या नविन पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मुहुर्तमेढ

इचलकरंजी
आजच्या डिजीटल युगात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवनविन संधी निर्माण होत असून त्या संधीचा लाभ घेण्यासाठी सखोल आणि व्यवसायिक ज्ञान आवश्यक आहे. यासाठी एमसीए म्हणजेच मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लीकेशन हा अभ्यासक्रम उपयुक्त असा आहे. उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ब्रँण्ड म्हणून डीकेटीई या संस्थेला मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लीकेशन (एमसीए) या २ वर्षाच्या पदव्युत्तर कोर्सला एआयसीटीई, न्यू दिल्ली यांचेकडून मान्यता मिळालेली आहे. या नविन कोर्स ची विद्यार्थी प्रवेश क्षमता ६० इतकी असून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून डीकेटीईमध्ये प्रवेशास सुरवात करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एमसीए चे शिक्षण घेण्याची सुसंधी निर्माण झाली आहे.
डीकेटीईमध्ये बी.टेक. इन कम्प्युटर सायन्स ऍण्ड इंजिनिअरींग, बी.टेक. इन अर्टिफिशिएल इंटेलिजिएन्स ऍण्ड मशिन लर्निंग, बी.टेक. इन डेटा सायन्स हे कम्प्युटरशी संबंधीत अभ्यासक्रम सुरु आहेत त्यामुळे डीकेटीईमध्ये अत्याधुनिक कम्प्युटरच्या अत्याधुनिक लॅबस, सॉफटवेअरर्स आहेत. या सर्वांचा एमसीए कोर्समध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.  सायन्स  ग्रॅज्युएटसाठी कम्प्युटरची आवड असणा-या विद्यार्थ्यांना एमसीए हा उत्तम पर्याय आहे.
दोन वर्षाच्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रोग्रॅमींग भाषा (पायथॉन, जावा, सी प्लस प्लस इ.), सॉफटवेअर डेव्हलपमेंट व इंजिनिअरींग, डेटा बेस मॅनेजमेंन्ट सिस्टिम, अर्टिफिशीयल इंटेजिजन्स आणि मशिन लर्निंग, वेब डेव्हलपमेंट, मोबाईल ऍप डेव्हलपमेंट, क्लाउड कम्प्युटींग, सायबर सिक्युरीटी, डेटा सायन्स, बिग डेटा ऍनालिटीक्स इ. विषयाचा अंतर्भाव आहे. एमसीए उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफटवेअर डेव्हलपर / इंजिनिअर, डेटा ऍनॅलिस्ट, सिस्टीम ऍडमिनीस्टर, क्लाउड स्पेशालिस्ट, सायबर सिक्युरीटी ऍनालिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, आयटी कन्सलटंट अशा विविध पदावर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
अभियांत्रिकी शिक्षणामध्ये अव्वल असलेल्या डीकेटीई इन्स्टिटयूटमध्ये नव्याने सुरु होणा-या एमसीए हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी तज्ञ प्राध्यापक असून याचा लाभ शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच या ठिकाणी अद्यायावत अशा ‘ऍडव्हॉन्सड कम्पुटर लॅब’ ची सोयही आहे. या सर्व अत्याधुनिक सुविधा संस्थेत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यामुळे येथे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणांची सुविधा उपलब्ध होणार आहेत.
एमसीए हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख, आत्मनिर्भर भवितव्य घडविण्यास सक्षम कोर्स असून एमसीए च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे पेरली जातील. डीजीटल उत्पादन, मोबाईल ऍप्स, वेब डेव्हलपमेंट इ. क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय सुरु करता येईल. अभ्यासक्रमात उद्योगजगतातील इंटरनशिप्सचा समावेश असल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कालावधीतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येतो. एमसीए कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना एम.टेक. एमएस रिसर्च / पीएच डी मध्येही प्रवेश घेण्याचा मार्ग खुला होतो. एमसीए विद्यार्थ्यांद्वारे शाळा, संस्था आणि स्थानिक उपक्रमामध्ये, डिजीटल साक्षरता वाढवणारे प्रकल्प राबवले जाउ शकतात.  एमसीए प्रोग्रॅम सुरु होणे ही सुवर्णसंधी असून तंत्रज्ञानाध्दिष्टीत, सक्षम व आत्मनिर्भर समाज घडविण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाउल आहे.
तरी महा-एमसीए-सीईटी दिलेल्या कोणत्याही शाखेच्या पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे अवाहन महाविद्यालयामार्फत करण्यात आले आहे.
सदर कोर्सच्या मान्यतेसाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, कार्यकारी संचालक, रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांचे मार्गदर्शन मिळाले. पत्रकार परिषदेस संस्थेच्या संचालिका, प्रा डॉ. एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर, प्रा. डॉ. यु. जे. पाटील, उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More