चैनीसाठी दानपेटी वर डल्ला मारणाऱ्या दोघांना अटक.
इचलकरंजी
चैनीसाठी इचलकरंजी शहरातील तसेच आसपासच्या मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरणाऱ्या दोघांना इचलकरंजी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली.अभिषेक कांबळे व ऋत्विक संकपाळ दोघे राहणार माणकापूर अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी इचलकरंजी शहरातील सांगली रोड कडे जाणाऱ्या महासत्ता चौकातील मारुती मंदिर येथे २० ऑगस्ट रोजी दानपेटी फोडून १५ हजार रुपये रक्कम चोरीस गेल्याबाबत फिर्याद नोंद होती.प्रवीण फगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांचा तपास सुरू होता दोन दिवसापूर्वी हुपरी येथील दोन ठिकाणी मंदिरात अशाच प्रकारे चोऱ्या झाल्यानंतर इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अमर कदम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर प्रकरणातील दोन आरोपी माणकापूर येथे येणार असल्याबाबत समजले. त्यानंतर इचलकरंजी पोलीस ठाण्यातील प्रभारी प्रवीण खानापुरे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,उपविभागीय पोलिस अधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि विजय गोडसे,श्रीकांत वाघमारे,अनिल पाटील,अमर कदम,अमित कदम राम पाटील,नितीन ढोले यांच्या पथकाने संबंधित आरोपींना माणकापूर येथून ताब्यात घेतले.त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इचलकरंजी येथील महासत्ता चौकासहित इतर लहान-मोठ्या दहा ठिकाणी दानपेट्या फोडल्याचे कबूल केले आहे.याबाबत इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला असून आरोपीना अटक केली आहे.हुपरी येथील २ व इचलकरंजी येथील एक असे तीन गुन्हे नोंद असून इतर ठिकाणी कमी रक्कम असल्याने गुन्हे नोंद नसल्याची माहिती दिली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







