धोकादायक बीम वाहतुकीचा अजून एक बळी,पोलिसांची फिर्याद घेण्यास ५ तास टाळाटाळ.हुपरी पोलिसांवर कारवाईची मागणी.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धोकादायक बीम वाहतुकीचा अजून एक बळी,पोलिसांची फिर्याद घेण्यास ५ तास टाळाटाळ.हुपरी पोलिसांवर कारवाईची मागणी.

 हुपरी
इचलकरंजी शहरात व परिसरात धोकादायक बीम वाहतूक सुरू असून वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा फार्सच केला जात असल्याबाबत नाहरिक संतप्त झाले आहेत.इचलकरंजी शहरात धोकादायक बीम वाहतूकला बंदी घातली असताना अवैधरित्या बीम वाहतूक सुरू आहे.याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून एखाद्याचा जीव गेल्यावरच वाहतूक पोलिसांना जाग येते..अशीच घटना रांगोळी -रेंदाळ रस्त्यावर घडली.ता.३ रोजी इचलकरंजी येथील धोकादायक बीम वाहतूक करणाऱ्या टेंपोने मोटरसायकलस्वारास जोराची धडक देऊन शिवनाकवाडीतील बापूसो सत्याप्पा खोत वय ३६ याचा हकनाक बळी गेला.एका गरीब कुटूंबाचा आधारवड हरपला असून याच्या मृत्यूस जबाबदार कोण ?वाहतूक पोलीस या बीम धारकांवर तत्परतेने कारवाई करत नाहीत?काल हुपरी पोलीस ठाण्याचा अजब कारभार शिवनाकवाडीकरांना अनुभवायास आला.हुपरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास गेलेल्या शिवनाकवाडी ग्रामस्थांना हुपरी पोलिसांनी सापत्नपणाची वागणूक हुपरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.काही वेळात दाखल होणारी फिर्याद दाखल करून घेण्यास चालढकल करत चक्क ५ तास लावले.चालढकलीचे धोरण अवलंबून हुपरी पोलिसांनी शिवनाकवाडी ग्रामस्थांना वेठीस धरले..एखाद्या गरीबाला असा न्याय हुपरी पोलिसांकडून मिळत असेल तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा?काल शिवनाकवाडीकरांना पोलिसांच्या कर्तबगारीचा नमुनाच पहावयास मिळाला..वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कारवाई करून पोलिसांची प्रतिमा सुधारावी अशी  कळकळीची विनंती नागरिकांनी केली आहे,सुस्त बनत चाललेल्या हुपरी पोलिसांना वेळीच बंधन घालावे अन्यथा उरला सुरलेला पोलीसांवरील विश्वास तो ही नाहीसा होईल असेही नागरिकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
प्रकरण मिटवण्यासाठी दबाव.दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी.
मयत बापूसो खोत यांच्या अपघाताची फिर्याद दाखल करण्यास गेलेल्या नागरिकाना उलट सुलट प्रश्न विचारून उडवाउडवी केली.नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर एका माजी मंत्री व विद्यमान आमदारांच्या फोनाफोनी नंतरही फिर्याद नोंद करायला पोलीस तयार नव्हते शेवटी त्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय्य सहायकास संपर्क केल्यानंतर फिर्याद नोंद झाली.पोलीस इचलकरंजीतील मोठा व्यापाऱ्याचा टेंपो असल्याने अभय देत असल्याची चर्चा शिवणाकवाडीत सुरू होती.इंदिरा गांधी सामान्य रुग्णायलात रात्री १ च्या दरम्यान शवविच्छेदन होऊनही सकाळी ५ च्या दरम्यान गुन्हा नोंद झाल्यावर ६ वाजता मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More