हत्यारे विक्री करणाऱ्या दोघा परप्रांतीयांना हत्यारांच्या साठ्यासाह अटक.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील कबनूर अवैधरित्या हत्यारांची विक्री करण्यासाठी आलेल्या रोहितसिंग बबनसिंग टाक वय २० रा. निपाणी बेळगाव, ओमकार सिंग किरपालसिंग टाक वय २५ राहणार शिंदे नगर,निपाणी बेळगाव यांना विविध हत्यारांच्या साहाय्याने शिवाजीनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतले.
लोखंडी कोयते,सुऱ्या,गुप्ती,चाकू, अशी घातक हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांच्याकडून २०,६४० रुपयाची हत्यारे व एक २५००० रुपयांची मोटरसायकल असा एकूण ४५,६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी इचलकरंजी शहरांमध्ये हत्यारे विक्रीकरता आलेले दोघे परप्रांतीय कबनूर येथे ग्राहकाच्या शोधात असल्याबाबत पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक हिरो कंपनीची डीलक्स मोटरसायकल,८ तलवारी,२ गुप्ती, ५५ चाकु,११२ लोखंडी सुऱ्या,१७ लोखंडी कोयते व एक रामपुरी सुरा याचबरोबर प्लास्टिकची पोती ताब्यात घेतली असून एकूण ४५,६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्यांचे विरोधात अवैध हत्यारे विक्रीचा गुन्हा नोंद केला असून यातील आरोपी रोहित सिंग टाक याच्यावर यापूर्वी वडगाव पोलीस ठाण्यात याच प्रकारचा गुन्हा नोंद आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन पाटील यांच्यासह रमेश मोरे,कसे कर,गजानन बरगाले,पवन गुरव निलेश कोळी,सतीश कुंभार,प्रकाश पुजारी या पथकाने केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







