इचलकरंजी महानगरपालिका सर्व कार्यालयात आणि शाळात अग्निशमन उपकरणे बसवणार
इचलकरंजी
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अग्निशमन सेवांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महानगरपालिकेच्या विविध कार्यालयासाठी आणि महानगरपालिकेच्या सर्व शाळांसाठी अग्निशमन उपकरणे खरेदी करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.
सदर प्रस्तावास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार महानगरपालिकची सर्व कार्यालये आणि सर्व शाळेत विद्यार्थ्यांच्या व अग्निसुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जवळपास तीनशे अग्निशमन उपकरणे ( Fire Extinguisher ) बसविण्यात येणार आहे.
त्यामुळे शहरातील महानगरपालिकची सर्व कार्यालये आणि प्राथमिक शाळा आगीच्या दृष्टिकोनातून सुरक्षित होणार आहेत.
याबाबतची माहिती अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे यांच्याकडुन देण्यात आली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800