ICHMH51NEWS.IN
9921600800

महायुतीच्या फसव्या सरकारला व घराणेशाहीला दूर करा-सुहास जांभळे.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महायुतीच्या फसव्या सरकारला व घराणेशाहीला दूर करा-सुहास जांभळे.

इचलकरंजी : महायुती सरकार हे गोरगरिबांचे नसून फसवे सरकार आहे. तरी सुज्ञ मतदारांनी इचलकरंजीच्या घराणेशाहीला बाजूला ठेवत पारदर्शक उमेदवार  मदन कारंडे यांना निवडून देऊन कोरोचीसह परिसराचा विकास साधून घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास जांभळे यांनी केले.
           कोरोची ता हातकणंगले येथील चिंतामणी मंदिर परिसरामध्ये उमेदवार मदन कारंडे यांच्या घेण्यात आलेल्या कॉर्नर सभेवेळी ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कारंडे यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र विविध ठिकाणी दिसून येत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
                 दरम्यान,भाजप सरकारने महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे गुजरातला घेऊन जाऊन येथील लाखो तरुणांना बेरोजगार ठेवले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त पक्ष फोडून महाराष्ट्राचे वाटोळ केले असून अनेक गद्दारांना आपल्या सोबत घेऊन महाराष्ट्राला विकास कामाच्या बाबतीत मागे टाकले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता महायुती सरकारची पायउतार केल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे मत माजी राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी केले.
              लाडकी बहीण योजना चालू करून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढून सर्वसामान्य नागरिकांना योजनेची घोर फसवणूक केली आहे. एकीकडे योजना द्यायची आणि दुसरीकडे महागाई करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडायचे हे या भाजपने केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता या महायुती सरकारला पायउतार केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे शेळके यांनी शेवटी नमूद केले. कॉर्नर सभेत माजी जि.प.सदस्य देवानंद कांबळे, दीपक पाटील ,सतीश लोहार,  सदाशिव आत्मापुरे, दारासिंग सागरे, पोपट शिंदे ,चंद्रकांत आवळे, इम्तियाज शेख, अशोक तोडकर, ग्रा.पं. सदस्य स्नेहल कोरोचीकर, हलीमा सनदी, साहेबलाल शेख, अमोल कोरोचीकर आदी उपस्थित होते.

 

http://????आपल्या इचलकरंजीचे आपल्या हक्काचे चॅनेल ➡️???? क्लिक करा चॅनेल सबस्क्राईब करा https://ichmh51news.in/about-us ➡️Youtube https://youtube.com/@ichmh-51news?si=3iMKat-wZR8R6ANw

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा