खोतवाडीत लाडक्या बहिणींचा मदन कारंडेना पाठिंबा
इचलकरंजी:
खोतवाडी तालुका हातकणंगले येथील हनुमान मंदिर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ शनिवार सकाळी संपन्न झाला. यावेळी गाठीभेटी दरम्यान, विविध ठिकाणी कारंडे यांना पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत होते.
प्रचार सभेमध्ये खोतवाडीतील हनुमान मंदिर, चोपडे गल्ली, शिंदे मळा,हायस्कूल परिसर, आयोध्या नगर अशी फेरी काढत कारंडे यांनी मतदारांना अभिवादन केले. प्रचारादरम्यान, विविध ठिकाणी प्रमुखांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. त्यांनीही कारंडे यांना हार, बुके व शाल देऊन पाठिंबा दर्शवला. कारंडे यांच्या गटाकडून प्रचारादरम्यान उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. दरम्यान , अनेक ठिकाणी महिलांनी कारंडे यांचे औक्षण करीत पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी यासीन मुजावर, माजी सरपंच इलियास सुतार, नितीन कोकणे, सुजाता स्वामी ,अजय डुबल , रोहन माने , रवि सासणे , अजित सोळशे , नितिन पवार , बजरंग चोपडे , विनायक पाटील , पवन शिंदे , तानाजी तेलवे , नयन कांबळे , चंद्रकांत तांबवे , शिवलिंग पाटील ,मनोज कांबळे , सुधाकर कदम , मुसाली मुजावर यांचे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
???? चॅनेल सबस्क्राईब करा https://ichmh51news.in/about-us
*Youtube link* https://youtube.com/@ichmh-51news?si=3iMKat-wZR8R6ANw
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









